श्री प्रभु रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांना आदरांजली!

HomeNewsनागपुर डिवीजन

श्री प्रभु रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांना आदरांजली!

गौतम नगरी चौफेर नांदा फाटा :- श्री प्रभु रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय, नांदा फाटा येथे भारतीय समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी नुकतीच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी फुले यांच्या कार्याला आणि विचारांना आदराने वंदन करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सचिव डॉ. अनिल मुसळे हे होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. निलिमा हजारे, प्रा. विकास दुर्योधन, प्रा. संगीता बल्की, प्रा. वैशाली जमदाडे, प्रा. प्रकाश लालसरे, प्रा. स्वप्नील दुमोरे, आणि प्रा. स्वप्नील सातपुते यांची उपस्थिती लाभली. यासोबतच कोरपना येथील केंद्रप्रमुख सुनील कोहपरे, विषय तज्ज्ञ भीमराव कोरडे, आणि सावित्रीबाई फुले महाविद्यालयातील प्रा. दिनकर झाडे यांनीही कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवली.

महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रत्नाकर बोबाटे यांनी केले. विशेष उपस्थिती असलेले केंद्रप्रमुख सुनील कोहपरे यांनी महात्मा फुले यांच्या कार्यावर आधारित एक प्रेरणादायक गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनिल मुसळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांना, विशेषतः विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या विचारांचे आणि शिक्षणाचे महत्त्व समजावून मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश बांगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. नीता मुसळे यांनी केले. महात्मा फुले यांच्या विचारांना वंदन करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहाने व उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, ज्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

COMMENTS

You cannot copy content of this page