गडचांदुरातील साईं बाबा मंदिर परीसरात नगरपरिषदे मार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली

HomeNewsनागपुर डिवीजन

गडचांदुरातील साईं बाबा मंदिर परीसरात नगरपरिषदे मार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली

गौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार – दिनांक 4/2/2026 रोज बूधवारला  गडचांदूर येथील साईं बाबा मंदिर परीसरात व आंगनवाड़ी परीसरात नगरपरिषदे मार्फत स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली, परीसरातील नागरीक अनेक दिवसापासुन कच–याच्या ढिगा–या मुळे व गंदगी मूळे त्रस्त होते, वारंवार सांगूनही नागरीकांचा आवाज नगरपरिषदेच्या लोकप्रतीनिधी पर्यन्त पोहोचत नव्हता त्यामुळे वार्डातील नागरीक हतबल झाले होते, साईबाबा मंदिराला लागुनच आंगनवाड़ी आहें, आंगनवाड़ीच्या सभोवताल कच–याचा ढिगारा नेहमी पहायला मिळायचा मात्र नवनिर्वाचित नगरअध्यक्ष श्री निलेशभाऊ शंकरराव ताज़ने यांना परीसरातील नागरीकांनी परीसर स्वच्छत करण्याची विनंती केली असता नागरीकांची हाक ऐकताच नवनिर्वाचित नगरअध्यक्ष श्री निलेशभाऊ शंकरराव ताज़ने यांनी तात्काळ आज रोज बूधवारला नगरपरीषदेचे कर्मचारी व सोबत थे,सी,भी,घेऊन संपुर्ण परीसरातील घान -कचरा साफ करून साफ-सफाई अभियान मोहीम राबविण्यात आली व जागा लेवल करण्यात आली, यावेळेस नवनिर्वाचित अध्यक्ष श्री निलेश भाऊ ताज़ने  नगरपरिषदेचे उपाध्यक्ष श्री संजय भाऊ मेंढी, नगरसेवक,रामसेवक मोरे नगरसेविका सारीका डोरलीकर, अश्विनी कांबळे, संदिप शेरकी, नीतीन डोरलीकर , प्रतीक सदनपवार, व परीसरातील नागरीक उपस्थित होते, परीसरातील नागरीकांनी नगरपरीषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षांचे व सर्व लोकप्रतीनिधींचे आभार मानले

COMMENTS

You cannot copy content of this page