गौतम नगरी चौफेर //चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण. जिवती – दिनांक 12 मे 2025 रोजी पोलीस निरीक्षण कांचन पांडे साहेब पोलीस स्टेशन जिवती यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. की मौजा. कुंभेझरी येथे राहणारा .अनिल पांडुरंग बसवंते वय 36 वर्ष हा आपले घरी अवैधरित्या गांजा बाळगून चिल्लर विक्री करीत आहे. असा गोपनिय बातमी मिळाल्याने आरोपीचे घराचे झडती करिता श्री.मुम्मका सुदर्शन साहेब. पोलीस अधीक्षक ,चंद्रपूर श्रीमती. रिना जनबंधू मॅडम अपर पोलीस अधीक्षक ,चंद्रपूर श्री.रविंद्र जाधव साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर यांचे निदर्शनात पोलीस निरीक्षक,कांचन पांडे सा.
पोअ ,जगदिश मुंडे, पोअ, ज्ञानेश्व़र डोकळे, पोअ,किरण वाठोरे पोअ,अतुल कानवटे नी दोन अब्रूदार पंचासमक्ष सदर आरोपीचे घराची घरझडती घेतली असता .त्यांचे घरातील किचन रूममध्ये किचन ओट्याखाली एका कापडी पिशवीमध्ये एकूण. 1245 ग्रॅम वजन असलेला गांजा, की 12,000 रुपये चा मिळून आल्याने सदर आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन जिवती येथे अप क्र.43/2025 कलम 20 (ब) गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधि.1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला .सदर गुन्ह्यात आरोपी नामे, अनिल पांडुरंग बसवंते वय 36 वर्ष रा.कुंभेझरी यास अटक करण्यात आली. असून सदर गुन्ह्याचे तपास पोलीस स्टेशन जिवती येथील मा.पोलीस निरीक्षक, कांचन पांडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि,निलेश वाडीवा सा.हे करीत आहेत.




COMMENTS