अरुणा सालवटकर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन केला वाढदिवस साजरा.

HomeNewsनागपुर डिवीजन

अरुणा सालवटकर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन केला वाढदिवस साजरा.

– नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा स्तुत्य उपक्रम.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा – ४ फेब्रुवारी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या कोरपना तालुका महिला उपाध्यक्षा अरुणा सुभाष सालवटकर यांच्या वाढदिवसानिमित्याने गडचांदूर येथील पी. एम. श्री. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक १ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पाउच भेट देऊन वाढदिवस साजरा केला. यावेळी सुलभा कुरेकर, कोरपना तालुका महिला सचिव, लीना लांजेकर, गडचांदूर शहर महिला अध्यक्षा, सीमा वरारकर, वंदना मोरे, संध्या वाघाडे, महिला संघटीका गडचांदूर, सुलताना शेख,मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडचांदूर, चंदू कोटनाके सहाय्यक शिक्षक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पदाधिकारी, संघटक, सदस्य हे मुख्यत्वे करून पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे कार्यक्रम, जनजागृती वर आधारित उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करतात हे विशेष. पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व्हावे तसेच समाजातील दुर्बल घटक , शालेय विद्यार्थी , ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगासाठी संस्थेचे पदाधिकारी, संघटक,सदस्य हे स्वतः वर्गणी काढून उपक्रम – कार्यक्रम राबवित असतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघमित्रा ताकसांडे, गडचांदूर शहर कोषाध्यक्ष यांनी केले. आभार माया टिकले, गडचांदूर शहर महिला सचिव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

COMMENTS

You cannot copy content of this page