– ठाणेदार सचिन तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू अज्ञात आरोपींचा तपास लावण्याचे आश्वासन
– स्वान पथक भंडारा एलसीबीने सुद्धा केली पहाणी
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – पवनी तालुक्यातील महाबोधी उपासक संघ नागपूर शांतीवन बुद्ध विहार चिचाळ (पाथरी) येथे काल रात्री 18 नोव्हेंबर 2026 ला अज्ञात चोरट्यांनी स्वयंपाक हॉलमधील संपूर्ण स्वयंपाक साहित्याची चोरी जवळपास 1,75000 लाखाची केली असून या संबंधात अड्याळ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. चोरी झाल्याची घटना माजी ग्रामपंचायत सदस्य आशिष मेश्राम यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांना फोन द्वारे आज सकाळी 19 नोव्हेंबरला 6 वाजता कळवली होती . त्यानंतर लगेच त्यांनी अड्याळ पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक सचिन तायवाडे यांना फोन द्वारे कळविले. त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार करा असे सांगितले. त्यानंतर तेथील चौकीदार प्रमोद वासनिक यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. याबाबतीत ठाणेदार सचिन तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू असून आरोपीचा लवकरात लवकर तपास लावण्याचे व जवळपासचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचेआश्वासन पत्रकार संजीव भांबोरे यांना दिलेआहे. शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध (मेश्राम )असून ते नागपूरला राहतात त्यांना माहिती मिळतात हे सुद्धा शांतीवन बुद्धविहार चिचाळ येथे दाखल झाले. सदर चोरीची घटना 18 नोव्हेंबरच्या रात्री 12 ते 3 च्या दरम्यान असावी असा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी भंडारा स्वान पथक एलसीबी च्या पथकाने चोरी झालेल्या ठिकाणची पाहणी केली.

