चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयात सर्वसामान्यांना नागरिकांना पिण्याची पाण्याची टंचाई

HomeNewsनागपुर डिवीजन

चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयात सर्वसामान्यांना नागरिकांना पिण्याची पाण्याची टंचाई

– पत्रकार संजीव भांबोरे यांना सुद्धा फिल्टर पाण्याविना परतावे लागले गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
चंद्रपूर –
आज दिनांक 19 नोव्हेंबर 2026 ला दुपारी 3 वाजता प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे काही कामानिमित्त चंद्रपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात उपस्थित असता पाणी पिण्याकरिता आरो मशीन कडे गेले असता इतर नागरिक सुद्धा पाणी पिण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित होते. परंतु त्या आरो फिल्टर मध्ये पाणी नव्हते त्यामुळे पाणी न पिताच सदर व्यक्तीला तेथून परत जावे लागले. जिल्हा व सत्र न्यायालयात सर्वसामान्य नागरिकांना पिण्याचे पाण्याची व्यवस्था नसेल तर सर्वसामान्य जनतेला न्याय कसे मिळेल असा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. त्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयाने सदर न्यायालयात सर्वसामान्य नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे.

You cannot copy content of this page