HomeNewsनागपुर डिवीजन

लोणार धोटे गावाला अस्वच्छतेचा विळखा

गौतम नगरी चौफेर (राजुरा) – सुमठाणा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष रस्त्यांवरून वाहतेय सांडपाणी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात :
तालुक्यातील सुमठाणा गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे या गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य व अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या अक्षम्य आणि बेजबाबदार दुर्लक्षामुळे संपूर्ण गावाला अस्वच्छतेचा विळखा पडला असून, नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात नाल्यांचा उपसा व स्वच्छत्ता न केल्यामुळे सध्या नाल्यांमधील दूषित पाणी चेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्यव्यवस्था नसल्याने २४ तास रस्त्यांवरून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असते. सध्या पावसाचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाची स्वच्छ भारत, सुंदर भारत ही घोषणा केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचे विदारक चित्र लोणार धोटे गावात पाहायला मिळत आहे.

गेल्या महिन्यांपासून गावातील मुख्य अनेक चौक, निवासी भाग आणि मुख्य रस्त्यांवर सांडपाणी पसरल्याने गावाला कचराकुंडीचे आणि चिखलाचे आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने नालेसफाई व सांडपाण्याची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात प्रशासनाने त्वरित ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर सूमठाणा ग्रामपंचायतीसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक सचिन दडमल, उपतालुका प्रमुख रोशन नारे यांनी पंचायत समितीला दिलेल्या तक्रारीतून दिला आहे. आता तरी पंचायत समिती आणि ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर समस्येची दखल घेणार का, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page