दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजरत्न आंबेडकर 31 ऑक्टोबरला भंडारा जिल्हा दौऱ्यावर…

HomeNewsनागपुर डिवीजन

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजरत्न आंबेडकर 31 ऑक्टोबरला भंडारा जिल्हा दौऱ्यावर…

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा –
जिल्ह्यातील सर्व भिक्खु संघ ,धम्मगुरु, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी तथा बौद्ध उपासक/ उपासिका व आजी / माजी पदाधिकारी यांना आवाहन करण्यात येत आहे की,
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (संस्थापक डॉ.बाबसाहेब आंबेडकर) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर भारतीय बौद्धांची स्वतंत्र आर्थिक चळवळ व बँक,हॉस्पिटल,विद्यापिठ, मिडिया,छापखाने, विहारे, निर्माण करून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणे या बाबासाहेबांनी दिलेल्या उद्दिष्टांची अमलबजावणी करण्याबाबद खालील विहारांना भेटी देण्यान येत आहे.
सकाळी 11.30 वा. विश्रामगृह भंडारा येथे आगमन

दुपारी 1.00 वा.- श्रद्धाभूमी बुद्धविहार शहापूर, जवाहर नगर,

दुपारी 2.00 वा. *रमाई बुद्ध विहार रमाई वार्ड भंडारा व मैत्री बुद्धविहार नाशिकनगर, विहारांना भेटी व थोडक्यात मार्गदर्शन.

सायं. 4.00 महाप्रज्ञा बुद्धविहार लाखणी येथील विहाराला भेट व थोडक्यात मार्गदर्शन

सायं. 5.00 वा. :- डॉ. बाबसाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती साकोलीयेथील विहाराला भेट व थोडक्यात मार्गदर्शन

भंडारा जिल्हा दौरा समाप्त झाल्यानंतर सौंदड मार्गे *गोंदिया जिल्ह्याकडे प्रस्थान करणार आहेत.
करिता उपासकांनी सदर विहारामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष डॉ.प्रविन थुलकर व महासचिव मनोज बन्सोड यांनी केलेले केले.

You cannot copy content of this page