राजुरा येथे बथुकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. – स्वामी येरोलवार यांनी केले नेतृत्व; आमदार देवराव भोंगळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती.

HomeNewsनागपुर डिवीजन

राजुरा येथे बथुकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. – स्वामी येरोलवार यांनी केले नेतृत्व; आमदार देवराव भोंगळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१९ ऑक्टोबर शहरातील तिरंगा चौक राजुरा येथे बुथुकम्मा उत्सव समितीच्या वतीने २०२६ चा बथुकम्मा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने आयोजित केला. हा कार्यक्रम गेल्या २७ वर्षांपासून स्वामी येरोलवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला जात आहे. आमदार देवराव भोंगळे यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व समाजातील सदस्यांनी या उत्सवात मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला.

बथुकम्मा हा तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील सर्वात मोठा धार्मिक सण आहे. परंपरा आणि इतिहासात खोलवर रुजलेला हा नऊ दिवसांचा उत्सव, विविध समाजांना एकत्र आणून निसर्गाची पूजा आणि सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी एक आनंदी प्रसंग आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेषतः औद्योगिक पट्ट्यात, मोठी तेलगू भाषिक लोकसंख्या आहे. दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही राजुरा शहरात हा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.

यावेळी राजुराचे आमदार देवराव भोंगळे, माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार ॲड. संजय धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप देरकर, माजी नगरपरिषद अध्यक्ष रमेश नाळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक जाधव, ॲड. दीपक चटप, नगर सेवक सिद्धार्थ पथाडे, नगरपरिषदेच्या सभापती गीताताई पथाडे, नगरपरिषद सदस्या मयुरी पहानपट्टे, सतीश धोटे, अविनाश जाधव, ॲड. अरुण धोटे, राजुरा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन, डॉ. बाबोडे, डॉ.राजेश कतवारे, सोमेश्वर एटलावार, डॉ.उमाकांत धोटे, बी.यु. बोर्डेवार, श्रीकृष्ण गोरे, सागर भटपल्लीवार, बाबा बेग, हेमत झाडे, अब्दुल फारूकभाई, महेश रेगूडावर, सोमेश्वर ऐतलावार, सौ. अर्चना देवराव भोंगळे उपस्थितीत होते.

आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, बथुकम्मा उत्सव घरी साजरा करण्याऐवजी समाजातील सर्व सदस्य एकत्र येऊन सामूहिक उत्सव साजरा करीत असल्याने आजच्या डिजिटल युगात या महान संस्कृतीचे अस्तित्व दिसून येते.

या प्रसंगी, सुमारे १८० किलोग्रॅम वजनाच्या आणि सात रंगांच्या फुलांनी सजवलेल्या आकर्षक बथुकम्मा देवीच्या मूर्तीभोवती महिलांनी भक्तीगीतांच्या तालावर समूहाने नृत्य करून आपला आनंद व्यक्त केला आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी देवीकडे प्रार्थना केली. या उत्सवाचे उद्घाटन समितीचे मार्गदर्शक स्वामी येरोलवार यांच्या हस्ते झाले. तेलगू भाषिक समाजासोबतच मराठी भाषिक समाजानेही आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमात सहभाग घेतला. या महोत्सवासाठी बथुकम्मा देवी उत्सव समितीचे मार्गदर्शक स्वामी येरोलवार, व्यंकट स्वामी येरोलवार, कृष्णकुमार, पवन चितळा, सद्या इरावणे, श्रीनिवास भडारी, रमेश पेड्डी, राकेश नामेवार, केशव त्रिवेदी, सूरज तत्पल्लीवार, कृष्णा गेश्वर, कृष्णा गेष्कर, राकेश, श्रीनिवास भडारी प्रकाश चेन्नूरवार आदी मार्गदर्शकांनी प्रयत्न केले. श्रीनिवास वालाला, ओबुलेसू गविनी, शुभांगी गेडाम, अखिला व्यंकटेश येरोलवार, श्वेता श्रीनिवास येरोलवार, रूपा बोल्लू, विशाखा चितला, कृष्णवेणी तिरवेदी, शारदा भदारी, शारदा इरावणे, शिल्पा नामेवार, दिव्या तिग्री, अश्विन किरीद, मानसी, कृष्णावेणी, पं. कुमार, रामा चेन्नूरवार, महेश्वरी गविनी, सुजाता वलाला यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

You cannot copy content of this page