गौतम नगरी चौफेर (नांदेड) – नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचा मोर्चा वाहन चालक सचिन धोंडीबा सोनकांबळे यांची पुणे येथे करण्यात आलेल्या हत्येची सखोल चौकशी करून न्याय आणि मागण्याची पुर्तता करण्याकरिता अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने तारीख १९ डिसेंबर २०२५ ला नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. मौजा दापशेड तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील रहिवासी वाहनचालक सचिन धोंडीबा सोनकांबळे वय 28 वर्ष हा वाहन चालक म्हणून लक्ष्मी ट्रॅव्हल्स मानकर चौक वाकड पुणे येथे कामावर होता.
सचिन सोनकांबळे हे आपली ट्रॅव्हल्स घेऊन तारीख २८ नोव्हेंबर २०२५ ला जयपूर येथे जात असताना वाटेत त्याला मिरगी या आजाराची फिट आली आणि त्यांनी गाडी बाजूला घेतली. येथील प्रवास्यांनी पोलिसांना फोन केला. याच दरम्यान आरोपी अजित भोसले यांच्या चारचाकी वाहनाने सचिन सोनकांबळे यांच्या ट्रॅव्हल्सला मागून धडक दिली. यात भोसले यांच्या गाडीचा सामोरचा भाग डॅमेज झाला. मात्र भोसले हे येथील मोठे प्रस्थ असल्याने त्यांनी अरेरावी करत हुज्जत घातली. दरम्यान पोलिस सुद्धा येथे येऊन पोहोचलो. गाडी पोलिस स्टेशन येथे लावल्यावर गाडी मालकांनी भोसले यांना रुपये चाळीस हजार देऊन झालेले प्रकरण निपटविले. पोलिस स्टेशन येथे हे प्रकरण मिटविल्यानंतर सचिन सोनकांबळे यांचा मोबाईल फोन वाजवा आणि त्यावर बाबासाहेब आंबेडकर यांची रिंगटोन वाजली आणि अजित भोसले माथा भडकला. भोसले यांनी सोनकांबळे यांचा मोबाईल हिसकला आणि फोन डीपी, गॅलरीतील बाबासाहेबांचे, भिमा कोरगांवचे फोटो पाहून हिंसक झाला.

मुख्य आरोपी नामे अजित भोसले आणि त्यांच्या तीन चार साथीदारांनी तारीख 28 नोव्हेंबर 2025 ला वाहन चालक सचिन सोनकांबळेला जबरदस्तीने आपल्या गाडीत कोंबून आपल्या तीन-चार मित्राच्या सहकार्याने सचिन सोनकांबळे यांना जब्बर मारहाण केली व नंतर मरणासन्न अवस्थेत लक्ष्मी ट्रॅव्हल्स च्या पार्किंग मध्ये फेकून दिले. तो मरणासन्न अवस्थेत दोन दिवस पार्किंग मध्येच पडून होता. बेशुद्धावस्थेत तारीख 30 नोव्हेंबरला लक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या कर्मचाऱ्यांना माहिती झाल्यानंतर त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले. इलाजा दरम्यान तारीख 11 डिसेंबर 2025 ला सचिन सोनकांबळे मरण पावला. हे प्रकरण दाबण्यासाठी वाकड येथील श्री. माळी या पोलिस अधिकाऱ्यांनी मयत सचिन सोनकांबळे यांचा भाऊ विठ्ठल धोंडिबा सोनकांबळे यांना रुपये पाच लाख रुपये घ्या आणि हे प्रकरण तिकडच्या तिकड रफादफा करा म्हणून दबाव निर्माण केला.
तसेच या संपूर्ण प्रकरणाबाबत त्यांच्या व्यवस्थापकांची भुमिका अत्यंत संशयास्पद वाटत असून गाडीला ठोस लागली तर रुपये चाळीस हजार देऊन प्रकरण निपटावणारे व्यवस्थापक आपल्या वाहनचालकांवर झालेल्या अमानुष हमल्याची साधी दखलही न घेता उलट सचिन सोनकांबळे यांचे भाऊ विठ्ठल सोनकांबळे यांना सचिन सोनकांबळे हे ट्रॅव्हल्स घेऊन जयपूर राजस्थान येथे गेल्याची खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देत होते. तसेच हे एवढा मोठे गंभीर गुन्हा घडूनही लक्ष्मी ट्रॅव्हल्सचे मालक यांनी साधी दखल घेण्याचिही तसदी घेतली नाही.

सचिन सोनकांबळे यांना न्याय मिळाला म्हणून खालील मागण्या या मोर्च्याच्या माध्यमातून शासन, प्रशासनाला सादर करण्यात येत आहे-
१) आरोपी अजित भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोरातील कठोर शिक्षा व्हावी.
२) गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच लाख रुपयांचे आमिष दाखविणाऱ्या पोलिस मुळेवर गुन्हात सहभागी असल्याचा आणि एट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
३) आरोपी अजित भोसले हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे वाटत असून मयत सचिन सोनकांबळेच्या फिर्यादीवर दबाव, दहशत निर्माण करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून सदर खुनाचे प्रकरण पुणे न्यायालयात न चालविता हे प्रकरण नांदेड जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात यावे
४) खुनाचे प्रकरणाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लक्ष्मी ट्रॅव्हल्सचे मालक आणि व्यवस्थापकावर खुनाचा आणि एट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
५) सचिनच्या परिवाराला 50 लाख रुपयाची तात्काळ मदत करण्यात यावी.
६) निराधार झालेल्या परिवारातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी.
घडलेली घटना ही अत्यंत दुःखद मानवतेला लाजवणारी काळिमा फासणारी आहे. या घटनेचा निषेध करणे तेवढे थोडेच असून या घटनेच्या अनुषंगाने वरील मागण्या जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मान. मुख्यमंत्री, गृहमंत्री, कामगार मंत्री, परिवहन मंत्री यांना पाठविण्यात आल्या.
अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष शेख अय्युब यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्च्यात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, महाराष्ट्र सल्लागार तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोककुमार उमरे, आकाश ताकसांडे,शेख इद्रीस , संतोष ,पि, वाघमारे, शेख वाजिद शेख जिलानी, शेख रफिक शेख मेहबूब , शेख सेफी शेख अहमद, शुभम ढवळे, अहमद खान, शेख तनवीर पैलवान शेख रशीद, अहमद खान गैस खान इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यासमवेत मयत सचिन धोंडिबा सोनकांबळे यांचे वडील धोंडीबा मल्हारी सोनकांबळे, आई प्रयाग बाई धोंडीबा सोनकांबळे, भाऊ विठ्ठल सोनकांबळे, भाऊ चंद्रकांत सोनकांबळे, बहीण वर्षा साहेबराव कांबळे, बहीण ताई प्रकाश बनसोडे, छोटा भाऊ रवि सोनकांबळे भाऊ राहुल धोंडीबा सोनकांबळे, भगवान गजले, साहेबराव भोसले, चंद्रकांत सोनकांबळ, साहेबराव सोनकांबळे, साहेबराव गजले, भगवा गजले, महादेव कांबळे, सतीश गजले, नागराज गजले, अनिल नरसिंग सोनकांबळे ही दापोशेडकर आणि विविध वाहनचालक संघटना आणि सेवाभावी संघटनेचे मोर्च्यात सहभागी झाले होते.

COMMENTS