बिरसा सेनेचे देवराव भोंगळे यांना समर्थन.

HomeNewsनागपुर डिवीजन

बिरसा सेनेचे देवराव भोंगळे यांना समर्थन.

आदिवासी समाजाच्या हितासाठी सदैव तत्पर असेल – देवराव भोंगळे

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी राजुरा) दि. १२ जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या उत्कर्षाकरीता झटणाऱ्या अग्रणी संघटनेपैकी एक बिरसा सेना – शाखा चंद्रपुरने आगामी ७०- राजुरा विधानसभा निवडणुकीकरीता भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार देवराव भोंगळे यांना समर्थन पत्र देत आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे.

त्यानिमित्तानं बोलतांना देवराव भोंगळे म्हणाले की, बिरसा सेनेच्या या स्नेहपुर्वक विश्वासाप्रती मी त्यांचा शतशः ऋणी आहे. खरंतर धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या पार्श्वभुमीवर बिरसा सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आदिवासी बांधवभगिनींनी मला दिलेले हे समर्थनपत्र मी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचाच मौल्यवान आशीर्वाद म्हणून स्वीकारत आहे. यानिमित्ताने मी सर्व आदिवासी समाज बांधवांना विश्वास देऊ इच्छितो की, यापुढील काळात समाजाच्या हितासाठी व अडीअडचणीत हा देवराव भोंगळे कायम तत्पर असेल. यावेळी संघटनेचे संस्थापक प्रमुख अनिल आत्राम, जिल्हाप्रमुख कमलेश आत्राम, जिल्हा महासचिव मारोती जुमनाके व चंद्रपुर शहरप्रमुख दिवाकर मेश्राम हे हजर होते.

COMMENTS