जागतीक पर्यावरण दिनानिमित्त वरूर रोड येथील महिलांचा पर्यावरणपूरक उपक्रम.

HomeNewsनागपुर डिवीजन

जागतीक पर्यावरण दिनानिमित्त वरूर रोड येथील महिलांचा पर्यावरणपूरक उपक्रम.

– येणाऱ्या वटपौर्णिमेपुर्वी वडाच्या झाडाचे केले पुजन.

गौतम नगरी चौफेर  बादल बेले राजुरा ५ जुन – राजुरा तालुक्यातील वरूर रोड हे गाव. येथील महिला या अतिशय उपक्रमशील असून सातत्याने या गावात विवीध समाजपयोगी , धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक  उपक्रम ,कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. येणाऱ्या वटपौर्णिमेचे महत्त्व लक्षात घेऊन जागतीक पर्यावरण दिनानिमित्त गावातील वडाच्या झाडाचे पूजन करण्यात आले. यावेळी मंजुषा प्रकाश ठावरी, जिजाबाई बबन काळे, शारदा अविनाश ढोबे, कुसुम चंद्रभान गावडे, वर्षा विलास अस्वले,  मंगला रमेश काळे, रेखा दिलीप उपलवार, विश्रांती अशोक आत्राम,  मिनाबाई सुरेश सिडाम, सुलोचना विनोद काळे, शितल राजू काळे,  रंजना शंकर काळे, रजनी अमृत वैरागडे,  उषा सुधीर बोबडे,  वैशाली विकास कोळापे,  लक्ष्मी मुकेश अटवाल, आशा रामेश्वर ढोबे,  मंगला गंगाधर गौरकर,  निकिता मारुती वसाके, सुषमा दिलीप रणदिवे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

COMMENTS

You cannot copy content of this page