सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा.

HomeNewsनागपुर डिवीजन

सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा.

पीडित कुटुंबीयांनी केली मागणी
गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे) – दुर्गापूर पोलीस स्टेशन अंतर्गत चंद्रपूर शहरातील मातोश्री कनिष्ठ महाविद्यालय येते बारावी सायन्स ला शिकत असलेल्या कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जैतापूर येतील सतरा वर्षीय अल्पवइन मुलीने कॉलेज परिसरात राहत असलेल्या रूम मधे गळफास लावून अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सायंकाळी अंदाजे नऊ ते दहा दरम्यान आत्महत्या केली. मुलीच्या मामांना कळताच आरडा ओरडा केला व रूम शेजारील लोक जमा झाली नंतर  दर्गापूर पोलीस स्टेशन येते जाऊन तोंडी रिपोर्ट दिली. त्यानंतर मुलीच्या  आत्महत्ते प्रकरणाचा पी एस आय दिपेश ठाकरे यांच्याकडे तपास गेला पी एस आय दिपेश ठाकरे यांच्याशी संपर्क साधत असता कधी इलेक्शन ड्युटी, कधी सुट्टीवर तर कधी वाढदिवस असे कारण सांगत तपासात खूप दिरंगाई करत एक महिना लोटून गेला परंतु त्यांनी कुठलाच प्राथमिक तपास केलेला नाही त्यामुळे ठाकरे यांच्या तपासावर पीडित कुटुंबांनी खूप नाराजी व्यक्त केली आहे. पीडित कुटुंबांनी ठाणेदार मॅडम यांची भेट घेत झालेल्या प्रकरणाची काय चौकशी झाली अशी विचारणा केली असता पी एस आय ठाकरे यांची बदली झाली आहे असे सांगत पी एस आय मोहतुरे यांची तपासणी अधिकारी म्हणून नेमणूक केली असे संगितले. ठाणेदार मॅडम व पी एस आय मोहतूरे यांनी प्रकरण हाताळून पीडित कुटुंबाचे स्टेटमेंट नोंदवित पीडित कुटुंबांनी जैतापूर येतील आशिष नथु निब्रड ह्या तीस वर्षीय युवकावर संशय व्यक्त केला आहे. झालेल्या स्टेटमेंट वरून अधिकाऱ्याने समोरील चौकशीला गती दिली. परंतु मुलीकडे असलेला मोबाईल व संशइत असलेल्या आशिष निब्रड यांचा मोबाईल अधिकाऱ्याने जप्त करून तपासणीला पाठविला असे सांगितले असून मोबाईल चौकशीतून काय सत्य बाहेर येणार याकडे पीडित कुटुंबाचे व गावातील जनतेचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page