गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा – ॲड.यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी राजुरा द्वारा संचालित ॲड. यादवराव धोटे महाविद्यालय येथे राजुरा मुक्तीसंग्राम दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ठिक 8वाजून 10 मिनिटांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तथा संस्थेचे कोषाध्यक्ष सतीश धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना राजुरा मुक्ती संग्रामदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि लगेचच राज्यगीत घेण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.अर्पित धोटे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षी कालेश्वरवार, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे, पर्यवेक्षक प्रा. इर्शाद शेख, अमेय धोटे, अभिलाष धोटे, प्राध्यापक व कर्मचारी वृंद तसेच अन्य मान्यवर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमांतर्गत सरदार वल्लभभाई पटेल तसेच स्वामी रामानंदतीर्थ या थोर नेत्यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या वर्षा पोडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. आसावरी जिवतोडे यांनी केले.


COMMENTS