गौतम नगरी चौफेर (वरोरा) वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जील्हा चंद्रपूर
दिनांक १७ आक्टोंबर २०२५ ला यशदा पुणे येथे सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा संवाद वर्कशाप चे आयोजन करण्यात आले होते.या वर्कशाप ला महाराष्ट्रातून ३५० सहभागी नि सहभाग घेतला होता.यामध्ये संचालक , डॉक्टर, नर्सेस, आशा वर्कर्स, फार्माशिस्ट, एन.जी.ओ. उपस्थीत होते.तसेच ऑनलाईन लाईव्ह शेशनसाठी २० हजार अधिकारी कर्मचारी जुडले होते.हे वर्कशाप डॉ.निपुण विनायक सचिव आरोग्य सेवा महाराष्ट्र राज्य आय.एस.आय.अधिकारी वर्ग १ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ भगवान पवार संचालक आरोग्य सेवा पुणे यांनी आयोजित केला होता. त्यासाठी उदंड प्रतिसाद मिळाला. या वर्कशाप चे मुख्य मार्गदर्शक डॉ..मनोहर अगनानी निव्रुत्त अतिरिक्त सचीव भारत सरकार आरोग्य सेवा हे होते.सर्व जिल्ह्यातुन १०,१० वेगवेगळ्या काॅटागिरीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातून डॉ बंडु रामटेके वैद्यकीय अधिकारी वर्ग १ एस.टी.डिचे हेड, डॉ.संदिप भटकर मानसोपचार तज्ञ वर्ग १, डॉ संजय आसुटकर तालुका वैद्यकीय अधिकारी, पियुष कावळे वैद्यकीय अधिकारी, डॉ सचिन भगत ईपि डेमालाॅजीस्ट, डॉ जयश्री मुसळे जिल्हा समन्वयक आय पि एच एस, वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका, सुरेखा सुत्राळे पि.एच.एन., पुष्पा नखाते पि.एच.एन., धम्मदिना टेंभुर्ने पि.एच.एन. यशदा पुणे येथे सहभागी झाले होते प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्धता, सुविधा, यांवर आधारित वर्कशापचे आयोजन करण्यात आले होते.






COMMENTS