धावत्या भेटीचा क्षण

HomeNewsनागपुर डिवीजन

धावत्या भेटीचा क्षण

गौतम नगरी चौफेर (गडचांदूर) – मी, दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ ला नंदीग्राम एक्स्प्रेसने कुडूस ता. वाडा जि पालघर येथील संविधान सन्मान विचार मंच, ता. वाडा द्वारा दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोज मंगळवारला स्थळ- पष्टे मैदान, कुडूस आयोजित संविधान सन्मान रॅली व संविधान जागरला रिपब्लिकन चळवळीचे प्रमुख वक्ते म्हणून जात असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक डॉ बाबासाहेब आंबेडकर या पक्षाची पुनर्बाधणी अभियानाच्या कार्यांत सामील होणारे जालना येथील रिपब्लिकन चळवळीचे सहकारी आयु. अंकुश कांबळे जालना यांनी माझी जालना रेल्वेस्थानकावर धावती भेट घेऊन शाल पुष्पगुच्छ देऊन मनोभावे सत्कार केला आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुनर्बाधणी अभियानाला मंगलमय सदिच्छा दिल्यात तो क्षण-

बाबासाहेब म्हणतात- आपल्याला राजकीय सत्ता मिळाल्याशिवाय आपला सामाजिक व धार्मिक उद्धार होणे अशक्य आहे. आपला जो नाश झालेला आहे. आपण हजारो वर्षे खितपत पडलो आहोत यांचे कारण आपणास राजकीय सत्ता नव्हती हे आहे. आपण ती सत्ता मिळविली पाहिजे.

सध्याची राजकीय परिस्थिती सत्तासंपादनासाठी आपले मुक्तीदाते बाबासाहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष सोडून आंबेडकरी चळवळीच्या नांवाने प्रलोभित करणारे आतापर्यंत जेवढे प्रयोग केले ते संपुर्णपणे फेल झाले असून अशा प्रकारच्या प्रयोगामुळे मात्र मत आणि कार्यकर्त्यांची विभागणीच झाली आहे. आता आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना बाबासाहेबांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संविधानानुसार एकसंघ संघटनशक्ती निर्माण केल्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक नाही. यांची दिवसेंदिवस लोकांना जाणीव होत असून ते तथाकथित नेत्यांच्या तकलादू पक्ष संघटनेच्या मागे न लागता बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षातून संविधानानुसार संघटनशक्ती निर्माण करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत आहेत. संविधानाला मानणारा वर्ग, कार्यकर्ता तयार होत आहे.
ही लढाई तमाम दडपलेल्या समाज, वर्गाला राज्यकर्ते समाज बनविण्यासाठी बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाची आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या वैचारिक पक्ष संघटनेच्या अस्तित्वाची लढाई आहे. कोणी ही लढाई लढो अथवा न लढो बाबासाहेबांच्या अनुयायी कार्यकर्त्यांनी ही लढाई लढलीच पाहिजे. २६११२४

अशोककुमार उमरे, ८६९८८४२४०२, रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक

COMMENTS