गौतम नगरी चौफेर – दिनांक २ सप्टेंबर २०२४ ला पोषण महाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाला डॉ प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक, वंदना विनोद बरडे अधीसेवीका, डॉ.स्नेहाली शिंदे नेत्र शल्यचिकित्सक, डॉ आक्युब शेख जनरल फिजिशियन, गितांजली ढोक आहारतज्ञ यांच्या उपस्थितीत पोषण महाचे उद्घाटन करण्यात आले. डाॅ खूजे यांनी आहाराबाबत मार्गदर्शन केले. वंदना बरडे यांनी पिठोरी अमावस्या, बैलं पोळा, मात्रुत्व दिन व जागतिक नारळ दिवस यांच्या शुभेच्छा देऊन पोषण आहार माह मध्ये नारळाचे काय महत्त्व आहे ते समजावून सांगितले.तसेच पोषण मूल्या संबधी व त्यांचे महत्त्व समजावून सांगितले व त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन केले. गिंताजली ढोक यांनी प्रास्ताविक केले. सुत्र संचालन सोनाली राईसपाईले व आभारप्रदर्शन वंदना बुर्रेवार यांनी केले. कार्यक्रमासाठी मेहनत गितांजल ढोक, वंदना विनोद बरडे, वंदना बुर्रेवार सरस्वती कापटे हर्षा बालपांडे, यांनी केले व सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पोषण आहार माह चा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
Newer Post
फिल्म फेअर गितो की बरसात कार्यक्रम संपन्न Older Post
कू. मायसी झाली – राधा आणि श्री. झाला कृष्ण
COMMENTS