फिल्म फेअर गितो की बरसात कार्यक्रम संपन्न                                                  

HomeNewsनागपुर डिवीजन

फिल्म फेअर गितो की बरसात कार्यक्रम संपन्न                                                  

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी वरोरा) – दिनांक ३१आगष्ट २०२४ ला सायंटिफिक सभागृह नागपूर येथे  गितो की बरसात हा कार्यक्रम मूद्रा इव्हेंट अँन्ड मॅनेजमेंट मनिषा काशिकर यांनी आयोजित केला होता.या कार्यक्रमाला कांचन नितीन गडकरी, वंदना विनोद बरडे,श्रुती गांधी,विशाखा मंगले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या चारही प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रमांचे उद्घाटन केले व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ‌आणी कांचन गडकरी यांनी देवींचे गाणें म्हणून गितो की बरसात का कार्यक्रम ला सुरुवात करण्यात आली.आणी चारही महीला शक्ती यांनी कार्यक्रमाला व स्पर्धकांना शूभेच्छा दिल्या.वंदना बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ अध्यक्ष यांनी अवयव दान नेत्र दान देह दान रक्त दान करण्याचें आवाहन केले त्यांचे महत्त्व समजावून सांगितले.व त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन केले.गितो की बरसात कार्यक्रमात ज्या गाण्यांना फिल्म फेअर अवार्ड मिळालेले होते ते गाणें सादर करण्यात आले.आणी गाणें एकसे बढकर एक होतें.आणी गायकांनी एकसे बढकर एक गायले.असे वाटत होते प्रत्यक्ष हुबेहूब तेच गायक गात आहे ज्यांनी ते प्रत्यक्ष गाईले.असा माहोल तयार झाला होता.कोणालाही बाहेर जोरदार पाऊस होत आहे विजांचा कळकळाट होत आहे कांहीं भान नव्हते.विषेश असे की त्या वातावरणात खरोखर पावसांच्या गाण्यांचा अक्षरशः पाऊस पडला.आणी बाहेर विजांच्या कडकडाटात सह गीतों की बरसात रंगणीय, रमणीय झाला.कार्यक्रमाच्या नांवाला साजेल असा दोन्ही योग जुळून आला.निसर्गाची किमया अद्भभुत.यामध्ये गायक कलाकार मनिषा काशिकर,किर्ति डोकरिमारे, सोनाली अय्यर,सारिका तट्टे, गार्गी मानोरे, नम्रता नागपुरे, सारंग जोशी,सावीत्रि पोपालु, होते.आणि सुत्र संचालन शुभांगी रायलू यांनी केले.आणी प्रेक्षकांनी मनमुराद गितो की बरसात का आनंद घेतला.

COMMENTS