गडचांदूर येथे रिपब्लिकन चळवळीच्या चिंतन बैठकीचे आयोजन

HomeNewsचंद्रपूर

गडचांदूर येथे रिपब्लिकन चळवळीच्या चिंतन बैठकीचे आयोजन

गौतम नगरी चौफेर (गडचांदूर प्रतिनिधी) – ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर त. कोरपना जि. चंद्रपूर येथे तारीख ८ सप्टेंबर २०२४ रोज रविवारला वेळ सकाळी ११ : ३० वाजता विषय- १. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पक्षाच्या पुनर्बांधणीची दिशा.
विषय- २. अनुसूचित जातीचे वर्गिकरण क्रिमिलेयर आणि बौद्धांचे आरक्षण.
या विषयांवर चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

चिंतन बैठक या कार्यक्रमाचे प्रा. रमेश पाटील, माजी उपमुख्याध्यापक, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर हे अध्यक्ष राहणार आहेत. या विषयावर महाराष्ट्रातील ख्याती प्राप्त, प्रसिद्ध रिपब्लिकन विचारवंत रमेश जीवने, यवतमाळ हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय प्रचारक देवानंद लांजेवार, अमरावती आणि प्रसिद्ध लोककलावंत डॉ. निर्मल सरदार, अमरावती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

महोदय !  यादरम्यान चळवळीतील  सतत भेडसावणाऱ्या गंभीर समस्या, प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी खंबीरपणे सम्यक चर्चा घडवून समाधानकारक उत्तर शोधण्यासाठी आपण आले पाहिजे. आपण अगत्याने सहभागी होऊन बैठक यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजक रिपब्लिकन जागृती अभियान यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अशोककुमार उमरे, 8698842402 यांच्याशी संपर्क साधावा.

COMMENTS