गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे) राजुरा – विधानसभा क्षेत्रामध्ये धोटे – भोंगळे – फुसे – चटप – जुमनाके यांच्यामध्ये पचरंगी लढत पाहायला मिळत आहे.
काँग्रेस कडून विद्यमान आमदार व जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष सुभाष धोटे तर भाजपाकडून महायुती रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे आणि सामाजीक कार्यकर्ता संभाजी ब्रिगेडकडून भुषण फुसे आणि शेतकरी संघटनेकडून माजी आमदार वामनराव चटप आणि वंचित बहुजन आघाडी व गोंडवाना गणतंत्र पार्टीचे गजानन गोदरू जुमनाके आणि भाजपा महायुतीचे देवराव भोंगळे यांच्या मध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे.
भाजपा महायुती व मित्र पक्षाच्या आणि रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. दरम्यान गाव भेटी ग्रामस्थांच्या समस्या जाणून त्यावर तोडगा, संघटन कौशल्य, तगडा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करून राजुरा विधानसभेवर /भगवा / निळा झेंडा फडकविण्यासाठी ते सज्ज झाले आहे.
राजुरा विधानसभा मतदार संघात रिपब्लिकनचे ही मतदार आहेत त्यासोबतच आदिवासी मतदार निर्णायक ठरत असतो विधानसभेच्या व चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणामध्ये देवराव विठोबा भोंगळे यांचे रिपाइं आणि आदिवासी मतदारांवर प्राबल्य आहे. विधानसभेची निवडणूक लागली 2014 प्रमाणे याही निवडणुकीत भाजपा महायुतीचे देवराव भोंगळेच्या मागे रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांचे कोरपना तालुका अध्यक्ष प्रभाकर खाडे आणि सरचिटणीस व सर्व सदस्य यांच्या पाठीमागे उभी केली.
सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, यात राजुरा विधानसभा मतदार संघामध्ये प्रचार रॅली, कॉर्नर सभा, व गाव भेटी आणि डोअर टू डोअर प्रचारामध्ये महायुती च्या देवराव भोंगळे या उमेदवाराचा विजय पक्का मानला जात आहे.
राजुरा विधानसभा मतदार संघामध्ये रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आ)चे कार्यकर्ते भोंगळे यांच्या विजयासाठी एकवटला आहे, सोबतच इतरही समाजाचे मतदान भोंगळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने काँग्रेस – संभाजी ब्रिगेड- आणि शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी व गोंडवाना गणतंत्र पार्टीचे गजानन जुमनाके ला देवराव भोंगळे जबर धक्का देण्याच्या तयारीत आहे.
भोंगळे यांची प्रचार यंत्रणा ही तगडी आहे, महायुती, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस–रिपाई व मित्र पक्ष आणि खासकरून रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला समन्वय ही भोंगळेच्या प्रचार यंत्रणेची जमेची बाजू आहे. हे चित्र बघता जनतेमधून भोंगळेच्या विजयाचा सुर उगवत आहे.
COMMENTS