गांधीनगर (चंद्रपूर) ते भारत उद्योग गौरव पुरस्कार २०२५: नितीन अशोक गोवारदीपे यांची प्रेरणादायक यशोगाथा

HomeNewsनागपुर डिवीजन

गांधीनगर (चंद्रपूर) ते भारत उद्योग गौरव पुरस्कार २०२५: नितीन अशोक गोवारदीपे यांची प्रेरणादायक यशोगाथा

गौतम नगरी  चौफेर (एप्रिल २०२५) – चंद्रपूर जिल्ह्यातील गांधी नगर या छोट्या गावात वाढलेला एक तरुण, मोठी स्वप्नं घेऊन मुंबईत आला आणि आज राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. नितीन अशोक गोवारदीपे, सहसंस्थापक Transpower Solutions, यांना भारत उद्योग गौरव पुरस्कार २०२५ (Emerging Solar Tech Category) या श्रेणीत सन्मानित करण्यात आले. बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
नितीन अशोक गोवारदीपे यांनी आपले शालेय शिक्षण गावातच पूर्ण केले. पुढे त्यांनी वर्धा येथून नागपूर विद्यापीठ (Wardha, Nagpur University) येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन शाखेत अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. २०१३ साली ते मुंबईत आले आणि एका नामांकित लाईटिंग कंपनीत अभियंता म्हणून काम सुरू केले.

कामाच्या अनुभवातून आत्मविश्वास मिळाल्यानंतर, २०१७ मध्ये त्यांनी आपल्या मित्र पंकज लांजे यांच्यासोबत मिळून Transpower Solutions या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी आज LED आणि सौर ऊर्जा उपकरणांची निर्मिती करते, आणि त्यांचे ब्रँड नाव ‘LUME’ हे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात परिचित आहे.
सुरुवातीला व्यवसाय यशस्वी चालू असतानाही, कोरोना महामारीच्या काळात मोठ्या अडचणी आल्या. मात्र त्यांनी हार न मानता, गावाकडे परत जाऊन शासकीय क्षेत्रात संधी शोधल्या आणि त्यात यश मिळवले.

आज Transpower Solutions ही कंपनी शासकीय प्रकल्पांमध्ये, तसेच प्रसिद्ध हॉस्पिटल्स, हॉटेल्स आणि रिअल इस्टेट कंपन्यांसोबत यशस्वीपणे काम करत आहे. ग्रामीण भागातून येऊन अशा पातळीवर पोहोचणे हे स्वतःच एक प्रेरणा आहे.
“आमचा प्रवास हा केवळ व्यवसायाचा नाही, तर ग्रामीण तरुणांना स्वप्न बघायचं आणि त्यासाठी प्रयत्न करायचं बळ देणारा आहे,” असे नितीन अशोक गोवारदीपे यांनी सांगितले. या यशाचे श्रेय त्यांनी कुटुंबीयांच्या पाठिंब्याला आणि व्यवसायातील सहकाऱ्यांना दिले आहे.
Transpower Solutions आता सौर आणि LED तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतात अग्रगण्य ठरली आहे.
संप र्कासाठी:
📞 9623060889

COMMENTS