गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – आज दिनांक 15 नोव्हेंबर 2024 ला दुपारी 2 वाजता भंडारा तालुक्यातील रावणवाडी, गोलेवाडी, येटेवाही, या ठिकाणी बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले . व त्यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार संजीव भांबोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बिरसा मुंडा हे आदिवासींचे दैवत असून जल, जमीन जंगल, यावर आदिवासी समाजाचा अधिकारी असून तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. बिरसा मुंडा यांनी जीवाचे रान करून त्यांना अधिकार मिळवून दिले .यावेळी रावणवाडी येथील मनसाराम वाढवे अध्यक्ष ,कार्तिक सिडाम उपाध्यक्ष ,रोशन वाढवे सचिव, नामदेव वरखडे, आकाश वरखडे, धनंजय उईके, प्रवीण उईके ,विक्की वकलवकार ,शुभम उईके मंथन उईके, रितिक मस्के , येटेवाही येथे सुखदेव मडावी, संजय वरखडे, राजकुमार गोळंगे, रवींद्र गोळंगे, सुभाष संयाम, सत्यभामा वरखडे ,संजय वरखडे, तर गोलेवाडी येथे सुभाष मडावी अध्यक्ष, सचिव विष्णू मडकाम ,सहसचिव प्रमोद कोडापे सदस्य, अमरदीप मडावी, आसाराम मडावी, जितेंद्र मडावी ,जयदेव भुरे, राजकुमार ,मेश्राम ,संजय शेंडे,वरील कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी गावातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS