गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे विश्वरत्न, परमपूज्य, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून पूज्यनीय भदंत विनयबोधी महाथेरो यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पूज्यनीय भदंत विनयबोधी महाथेरो यांच्या उपस्थितीत विश्वरत्न, परमपूज्य, बोधिसत्व, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले व सामूहिक त्रिसरण, पंचशील, बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी बौद्ध उपासक, उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते.


COMMENTS