राजुरा शहरात वेग मर्यादा अंमलबजावणीसाठी पोलीस विभागाचा पुढाकार.

HomeNewsनागपुर डिवीजन

राजुरा शहरात वेग मर्यादा अंमलबजावणीसाठी पोलीस विभागाचा पुढाकार.

प्रमुख मार्गांवर वेग मर्यादा फलक बसविले.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. १५ जुलै
शहरातील वाढती वाहतूक, अपघातांची शक्यता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राजुरा पोलीस विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख मार्गांवर ३० किमी प्रतितास वेग मर्यादा तसेच “GO SLOW” (हळू चालवा) असे सूचना फलक बसविण्यात आले आहेत.
हे फलक बल्लारशा रोड,
बसस्थानका जवळ, रेल्वे क्रॉसिंगपूर्वी, सास्ती नाका परिसर
या मार्गांवर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक, शालेय विद्यार्थी, पादचारी तसेच नागरिकांची सततची वर्दळ असल्याने वाहनांचा वेग नियंत्रित ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी आणि वाहतूक अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने हे फलक लावण्यात आले आहेत.
राजुरा पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी सर्व वाहनचालकांना आवाहन केले आहे की, निर्धारित ३० किमी वेगमर्यादेचे काटेकोर पालन करावे. वाहने सावकाश चालवून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी. वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
पोलीस विभागाने नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले असून, अपघातमुक्त राजुरा घडविण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने जबाबदारीने वाहन चालवावे, असेही नमूद करण्यात आले आहे.
“वेगावर नियंत्रण ठेवा – सुरक्षित जीवन जगा. वाहतूक नियमांचे पालन करा, अपघात टाळा.” असा संदेश राजुरा पोलिसांनी दिला आहे.

    You cannot copy content of this page