वनमहोत्सव अंतर्गत “अमृत वृक्ष आपल्या दारी” अभियाना अंतर्गत वृक्षारोपण.

HomeNewsनागपुर डिवीजन

वनमहोत्सव अंतर्गत “अमृत वृक्ष आपल्या दारी” अभियाना अंतर्गत वृक्षारोपण.

आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथे वृक्षारोपण उत्साहात संपन्न.गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१६ जुलै बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल, राजुरा येथे वनमहोत्सव – “अमृत वृक्ष आपल्या दारी” या अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन सामाजिक वनीकरण विभाग, चंद्रपूर अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरा दिगंबर बल्की यांनी केले. यावेळी सुनील मेश्राम , वनपाल, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा तसेच राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाची गरज, प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय हरित सेना (इको क्लब) चे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात प्रत्यक्ष सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली. वृक्ष लावणे ही केवळ एकदिवसीय कृती नसून त्यांचे नियमित संगोपन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश मान्यवरांनी दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून शाळेचा परिसर अधिक हिरवागार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, राष्ट्रीय हरित सेना इको क्लबचे सदस्य आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
“एक विद्यार्थी – एक वृक्ष, हरित भविष्याची भक्कम दिशा” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

    You cannot copy content of this page