गौतम नगरी चौफेर कोरपना वार्ता चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस तूर सोयाबीन मिरची उत्पादन मोठ्या प्रमाणात करणारे शेतकरी म्हणून कोरपणा तालुक्याची ओळख आहे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती असून मुख्य मार्केट यार्ड कोरपणा व उप बाजारपेठ गडचांदूर या ठिकाणी आहे या दोन्ही ठिकाणी कार्यक्षेत्रात 10 जिनिंग प्रेसिंग कापसाचा मोठी व्यापार पेठ म्हणून या तालुक्याची ओळख आहे लगतच्या तेलंगाना राज्यसह वनी व चंद्रपूर तालुक्यातील शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेती उत्पादित धान्य विक्रीसाठी मार्केटमध्ये आणतात मात्र कोरपणा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती गाढ झोपेत असून गेल्या चार वर्षापासून लिलाव पद्धती बंद करून व्यापाराच्या दारावर धान्य व विक्रीची नामुश्किल शेतकऱ्यावर ओढावली आहे बाजार समितीचे असभ्य दुर्लक्ष असून अनेक व्यापारी बाजार समितीकडून वेळोवेळी तपासणी होत नसल्याने तोलई काट्यामध्ये तफावत असल्याची ओरड शेतकऱ्याकडून होते यापूर्वी देखील काट्यामध्ये तफावतीच्या मोठ्या घटना या मार्केटमध्ये घडल्या होत्या मात्र असे असताना बाजार समितीचे सचिव बाजार समितीचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती धोरणानुसार खरेदी लिलाव पद्धती अमलात आणणे व वेळेवर शेतकऱ्यांना चुकारे अदा करणे केलेली नियम असतानाया ठिकाणी लोकप्रतिनिधीचे वचक नसल्याने सचिव यांची मनमानी सुरू आहे यामुळे अनेक खरेदी विक्रीमध्ये घोटाळे होत असून व्यापाऱ्याकडून वसूल करण्यात येणाऱ्या शेष मध्ये देखील अनेक अनेक घोटाळे असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठी नाराजी आहे एकतर शेतकरी प्रथमच संकटात आहे कोरफना बाजार समितीकडून नियमित तपासणी काटा पावती याबद्दलचे कोणतेही प्रभावी नियम अमलबजावणी केल्या जात नाही मार्केट यार्ड मध्ये लिलाव सुविधा गोडाऊन व्यवस्था असताना सुद्धा बाजार समितीकडून कधीच लिलाव करण्याकरिता योग्य प्रयत्न झालेले नाही यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्याच्या दारात म** विक्री करून संपूर्ण राज्यामध्ये दलाली बंद असताना दलाली कापणे काट्यामध्ये फरक असणे तसेच नियमाप्रमाणे चुकार्य अचान करणे अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांची आहे कोरपणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर शुकशुकाट असून हे व्यापाऱ्यांच्या दारात मात्र शेतकऱ्यांचे मात्र विक्रीची गर्दी दिसून येते याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संचालक मंडळ व सचिव गंभीरतेने दखल घेऊन कोरपना येथील मार्केट यार्ड वर लिलाव पद्धती सुरू करणार का की शेतकऱ्याचे शोषण होत असताना उघड्या डोळ्याने बघणार असा सवाल शेतकरी करू लागले आहे


