कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी जनजागर संघटनेच्या वतीने भंडारा येथे संगीतमय आंदोलन २१ जुलै रोजी

HomeNewsनागपुर डिवीजन

कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी जनजागर संघटनेच्या वतीने भंडारा येथे संगीतमय आंदोलन २१ जुलै रोजी

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – जनजगार कला साहित्य बहुउद्देशीय संस्था साकोली यांच्या वतीने दि.२१ जुलै २०२६ रोजी स. ११ वाजता त्रिमूर्ती चौक भंडारा येथे परमानंद मेश्राम सामाजिक चळवळीचे नेते यांच्या नेतृत्वात भव्य कलावंतांचे संगीतमय आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनातील प्रमुख मागण्यामध्ये २०२५ -२६ मधील मानधन लाभार्थी निवड एक वर्ष होऊनही अद्याप कलावंत निवड झालेली नाही ती तात्काळ करण्यात यावी, राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन समिती अध्यक्ष हे कलावंतांमधूनच असला पाहिजे, कलावंतांना आरोग्य विमा लागू करा, मानधन कलावंत निवड ही जिल्ह्यामधून किमान ५०० कलावंतांची निवड करावी, कलावंतांच्या गाडीला टोल नाका मोफत असायला पाहिजे, मानधन कलावंतांची वय ही ४५ वर्षे असावी, प्रत्येक तहसिल मधून निवड करतांना कलावंतांचा निकष ठरलेला असावा उदा.नाटक, वादक, पेंटर, तमाशा, गोंधळ, दंडार,भजन या क्षेत्रातील कलावंत किती निवडायचे हा निकष असला पाहिजे,प्रत्येक कला क्षेत्रातील नामांकित कलावंत/राज्य स्तरीय, जिल्हा स्तरीय अशा कलावंतांची मानधन समितीवर निवड करावी, कलावंतांचं मानधन हे मासिक दहा हजार रुपये असायला पाहिजे या व इतर मागण्यांचा समावेश आहे. त्यासाठी संगीतमय आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व स्तरीय कलावंतांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जनजगार संघटनेचे अध्यक्ष भावेश कोटांगले, भूमाला उईके जेष्ठ नाट्य कलावंत, उपाध्यक्ष उमेश भोयर, सचिव धनंजय धकाते, निलाराम बागडे, पुण्यशील कोचे, संदिप कोटांगले, गुड्डू बोरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page