कोरपना नगर पंचायतचे उपाध्यक्ष इस्माईल रसूल शेख यांची एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर निवड

HomeNewsनागपुर डिवीजन

कोरपना नगर पंचायतचे उपाध्यक्ष इस्माईल रसूल शेख यांची एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर निवड

गौतम नगरी चौफेर राजुरा, दि.२० जून
कोरपना नगर पंचायतचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ लोकप्रतिनिधी इस्माईल रसूल शेख यांची महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर निवड झाल्याबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पाठविण्यात आलेल्या पत्राद्वारे ही निवड जाहीर करण्यात आली आहे. लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या समितीमध्ये शेख यांची निवड ही कोरपना नगर पंचायतसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
आरोग्य, स्वच्छता, पोषण, पाणी गुणवत्ता तसेच रोगप्रतिबंधक उपाययोजनांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवून आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी ही समिती कार्य करणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्रियपणे काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणून इस्माईल शेख यांचा अनुभव या समितीच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page