गौतम नगरी चौफेर (रविंद्र भगत गडचांदूर) दिनांक 27/10/2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन गडचांदूर हद्दीत NDPS कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.पोलीस स्टेशन गडचांदूर येथे गुन्हा रजि. नं. 508/2026 कलम 8(क), 20(ब)(II)(ब) NDPS Act अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई मध्ये 01 किलो 93 ग्रॅम गांजा, एकूण किंमत अंदाजे 54,650/- रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपी नामे जंगू मारोती कुंभरे, वय 51 वर्ष, रा. बैलमपूर, ता. राजुरा, जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून ताब्यात घेण्यात आला असून सदर आरोपीस अटक करण्यात आली पुढील तपास पोलीस स्टेशन गडचांदूर करीत आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रपूर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा विभाग यांचे मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक प्रमोद बनबले यांचे नेतृत्वात पोउपनि पंकज हेकाड, नापोअ बलवंत शर्मा, पोअ सुरज ढोले, पोअ प्रकाश बाजगीर, पोअ साईनाथ उपरे, पोअ मनोहर जाधव, पोअ पराग राजूरकर, मपोअ कविता पळनाटे यांनी सदरची कामगिरी पार पाडली.
पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन गडचांदूर यांनी आमचें गौतम नगरी चौफेर चे प्रतिनिधी रवींद्र भगत यांना माहिती सह 🙏🙏

