गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१४ जुलै राजुराचे माजी आमदार आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रभाकरराव मामुलकर यांच्या पत्नी सुमनताई मामुलकर वय ८४ यांना उतारवयात मदतीकरिता ठेवलेल्या सख्या बहिणीचा मुलगा अभिजित भुते व इतर चार व्यक्तींनी जवळपास पाच करोड संपत्ती एकाच दिवशी आपल्या नावाने करून संपत्तीतून बेदखल केले. याची माहिती होताच संतप्त सुमनताई मामुलकर यांनी २८ जून २०२६ ला पाच व्यक्ती विरुद्ध राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार देऊन पंधरा दिवस झाले कोणतीच पोलीस कार्यवाही झाली नाही. दोन तास पोलीस स्टेशन मध्ये सुमनताई मामुलकर यांना बोलावून बयान घेतले. या संपूर्ण घटनाक्रम मुळे राजुरा पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. यामुळे संस्थेचे कर्मचारी जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांची भेट घेऊन निवेदन दिले.मला खोटी माहीती देऊन जमीन विकत घेणे आहे म्हणून मला नेले आणि माझी संपत्ती नावानी करून माझी फसवणूक केली वयाच्या ८४ वर्षात मला बेघर केली, संपत्ती हडपली अश्या व्यक्तीवर कार्यवाही करावे आणि मला न्याय मिळवून द्यावे.असे बयान सुमनताई मामुलकर यांनी पोलीस स्टेशन राजुरा येथे दिले आहे यानंतर सुद्धा राजुरा पोलीस कुठलाही गुन्हा दाखल करीत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. आज दिनांक १४ जुलै २०२६ ला निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली. या प्रसंगी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे सचिव अविनाश जाधव, कोश्याध्यक्ष साजिद बियाबानी,प्राचार्य डॉ .एस. एम. वारकड, उप प्राचार्य डॉ . राजेश खेराणी, सेवानिवृत्त मुख्यद्यापक पी. एस. उराडे, केवाराम डांगे, मुरलीधर श्रीकोंडावार , राजकुमार ठाकूर, मॉर्निंग ग्रुप अध्यक्ष मसूद अहमद, डॉ. के. आर. टेम्भूरणे, दादाजी झाडे, प्रभाकर बोबाटे, सर्वांनंद वाघमारे, प्रा. बी. यु. बोर्डेवार, कृतिका सोनटक्के, जोत्सना घोटेकर, प्रज्ञा वैद्य, आनंद चलाख, पद्माकर गोहणे रवी लिपटे, उपस्थित होते.

