नाशिक पोलीस कॉन्स्टेबल पदी नियुक्ती झाल्याबद्दल विपुल माटे यांचा सत्कार_

HomeNewsनागपुर डिवीजन

नाशिक पोलीस कॉन्स्टेबल पदी नियुक्ती झाल्याबद्दल विपुल माटे यांचा सत्कार_

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा –
मोहाडी तालुक्यातील पोलीस भरती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून नाशिक पोलीस दलात कॉन्स्टेबल पदी निवड झाल्याबद्दल बोथली येथील सुपुत्र विपुल माटे व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला.

परमात्मा एक सेवक परिवाराच्या वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. विपुल माटे यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. त्यांनी ग्रामीण भागातील युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी उपस्थित सेवक-सेविकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सत्कार सोहळ्याला बोथली येथील सर्व सेवक-सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page