वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा ….शेतकऱ्यांचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन

HomeNewsअमरावती डिवीजन

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा ….शेतकऱ्यांचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन

गौतम नगरी चौफेर (प्रतिनिधी, खुशाल जाधव, यवतमाळ जिल्हा) आर्णी :दक्षिण वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा तेरा बीट व तीन वर्तुळ क्षेत्रात वन्य प्राण्यांने धुमाकूळ घातला असून शेतातील खरीप पिक कापूस तूर सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा असे निवेदन सदर परिसरातील शेतकऱ्यांनी आर्णी दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी सी एस गावंडे यांना देण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की जंगली प्राणी रोहि डुक्कर व अन्य प्राणी रात्री व दिवसा शेती पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागतो आणि त्यात शासनाकडून अल्प प्रमाणात नुकसान भरपाई मिळते पिकाची पाहणी करून नुकसान भरपाई च्या रूपात भरीव मदत देण्यात यावी तसेच जंगल परिसरात तार कुंपण करण्यात यावे अशी  मागणी सदर शेतकऱ्यांनी केली आहे संबंधित अधिकारी या विषयाची तात्काळ दखल न घेतल्यास शेतकऱ्यांमार्फत जन आंदोलन करून वन मंत्र्यांना निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी निवेदनातून स्पष्ट केले यावेळी उपस्थित वामनराव राठोड उदयसिंग चव्हाण शाबू सर्वे पुंडलिक जाधव रमेश चव्हाण मधुकर राठोड लव चव्हाण अनिल सोयाम अदी शेतकरी उपस्थित होते

COMMENTS