ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे पोषण आहार माह मध्ये प्रश्न मंजुषा कार्यक्रम संपन्न

HomeNewsनागपुर डिवीजन

ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे पोषण आहार माह मध्ये प्रश्न मंजुषा कार्यक्रम संपन्न

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी वरोरा) – पोषण आहार माहच्या निमित्ताने ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे प्रश्न मंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी व्यासपीठवर उपस्थित वंदना विनोद बरडे अधीसेवीका, गीतांजली ढोक आहारतज्ञ, सतिश येडे आरोग्य सहाय्यक, उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये वंदना विनोद बरडे अधीसेवीका व गितांजली ढोक आहारतज्ञ यांनी प्रश्न मंजुषा घेतलीं. मेहरूनीसा शेख, वैष्णवी शंकर चव्हाण, प्रनोती स्वप्नील पाटील,, पायल वीक्की चव्हाण, आरती अरविंद बारापात्रे, पायल विवेक ताजणे, वर्षा अमोल ढोक यांनी प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली. म्हणून ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला आणि या सर्व विजयी लाभार्थी यांनी बक्षीस देण्यात आले. कळधान्य प्रदर्शनी लावण्यात आली होती. तसेच बाॅनर, पोस्टर प्रदर्शन लावले होते. या कार्यक्रमांचे सुत्र संचालन प्रियंका दांडेकर यांनी केले आभारप्रदर्शन स्वाती जुनारकर यांनी केले व किरणं वांढरे यांनी मदत केली. कुंदा मडावी यांनी मेहनत घेतली.

COMMENTS