गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा – पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल भुयार येथील शिक्षण विस्तार अधिकारी वासुदेव अमृतराव नान्हे पंचायत समिती पवनी यांचा 31 जुलै 2025 ला सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष म्हणून संगीता नवघरे जिल्हा परिषद सदस्य जि प भंडारा उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंगला बाळबुदे सदस्य पंचायत समिती पवनी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून संजय कुमार वासनिक गटशिक्षण अधिकारी पवनी, संदीप आटमांडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती भुयार, पत्रकार मनोज चिचघरे भुयार, मेघराज जोगवे ग्रामपंचायत सदस्य, अविनाश वाघमारे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती भुयार, प्रकाश अलोने शाळा व्यवस्थापन समिती भुयार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचप्रमाणे भुयार केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी, सेवानिवृत्त शिक्षक, विद्यार्थी यांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरारी कढव मुख्याध्यापक आमगाव यांनी केले. तर दिलीप वैद्य मुख्याध्यापक काकेपार यांनी जीवन परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संचालन हिरालाल वाकडे त्याचप्रमाणे योगिता ताजणे यांनी केले. आभार पी. एम .भुरे यांनी मानले.


COMMENTS