गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा //रामपूर:- समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या उद्देशाने सुरज गव्हाणे यांनी आज दिनांक २६ सप्टेंबर २५ रोजी रामपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या समवेत आपला वाढदिवस अनोख्या सामाजिक पद्धतीने साजरा करत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. या उपक्रमात अनेक गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन आदी साहित्य देण्यात आले. “वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ केक कापण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी उपयोगी करावे, अशी माझी इच्छा होती,”विद्यार्थी हा आपल्या देशाचा मजबूत पाया आहे. असे सुरज गव्हाणे यांनी सांगितले.

या स्तुत्य उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले असून, हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. यावेळी उपस्थित जी.प. शाळेचे मुख्याध्यापक मनोहर वाघमारे सर, शिक्षिका राठोड मॅडम, शिक्षक सिडाम सर, उत्पल गोरे, कुणाल जूनघरे, अंकुश मस्की, विक्रम कोडीरपाल, साहिल उताणे, अतुल हिंगाणे, यश पेटकर,कान्हा मालेकर, सौरभ मादासवार, साहिल कोरडे, वैभव बोरकुटे, गौरव खेडेकर, शुभम जंपरवार, नितेश बोबडे, यश पेटकर, कान्हा मालेकर, हे सर्व हजर होते


COMMENTS