उद्या साकोलीत “विदर्भ निधी बॅंकेचा” व्यापारी मेळावा

HomeNewsचंद्रपूर

उद्या साकोलीत “विदर्भ निधी बॅंकेचा” व्यापारी मेळावा

साकोली सेंदूरवाफा शहरातील लहान मोठ्या व्यापारींसाठी आर्थिक विकासाची संधी
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा : “बिझनेस कॉन्क्लेव्ह २०२५” हे विदर्भ निधी बँकेचा उपक्रमाने
व्यवसायाच्या नव्या संधी शोधण्यासाठी उद्या ( शनि. १९ जुलै ) ला व्यापारी मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला जास्तीत जास्त व्यापारी बंधूंनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष प्रविण भांडारकर यांनी केले आहे.
              विदर्भ निधी अर्बन क्रेडिट को. ऑप.सोसायटी लिमिटेड भंडारा यांच्या वतीने “साकोली सेंदूरवाफा व्यापारी मेळावा २०२५” चे आयोजन उद्या सायं. ७ वाजता भारत सभागृह, नागझिरा रोड साकोली येथे करण्यात आले आहे. या मेळाव्याचे खास उद्देश म्हणजे लहान मोठ्या सर्व व्यापाऱ्यांसाठी हा व्यासपीठ आदान-प्रदान व संवादासाठी एक उत्तम संधी ठरणार आहे. साकोली व सेंदूरवाफा परिसरातील व्यावसायिकांसाठी एकमेकांशी सुसंवाद साधण्याची व व्यापारी दृष्टिकोनातून नव्या संधी शोधण्याची ही संमेलनाद्वारे चांगली संधी आहे. या मेळाव्यात विविध विषयांवर चर्चासत्र, अनुभव कथन, स्थानिक व्यापाराची दिशा आणि सरकारी योजनांचा लाभ यावर विचारमंथन होईल अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
          साकोली व सेंदूरवाफा परिसरात व्यापाऱ्यांचे जाळे अधिक मजबूत करणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि परस्पर सहकार्याचे वातावरण निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून, अनेक प्रतिष्ठित व्यावसायिक, उद्योजक व बँकिंग क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विदर्भ निधी अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण भांडारकर यांनी केले असून या मेळाव्यात व्यापारांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page