बनावट, खोटे, बोगस विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करून, ते शपथपत्र चंद्रपूर न्यायालयात – विनोदकुमार खोब्रागडे

HomeNewsनागपुर डिवीजन

बनावट, खोटे, बोगस विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करून, ते शपथपत्र चंद्रपूर न्यायालयात – विनोदकुमार खोब्रागडे

गौतम नगरी चौफेर – दाखल केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, बलारपुरचे शहर अध्यक्ष बादल खुशालराव उराडे यांच्या विरुद्ध न्यायालयाचा आदेशानुसार लवकरच FIR दाखल होणार खोटे, बनावट, विवाह नोंदणी प्रमाणपत्र बामणी ग्रामपंचायत येथे तयार करून माला रामभाऊ पारखी उर्फ रत्नपारखी सोबत लग्न झाल्याचे दाखवुन तिच्या मृत्यु पीतर्थ देय असलेली रक्कम १,३५,६,७००/- रुपये हडप करनार होता
मात्र हा महाघोटाळा विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते तथा माला रामभाऊ पारखी उर्फ रत्नपारखी यांचा सख्खा चुलत देर यांच्या लक्षात आले व त्यांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले. याच बादल उराडे यांनी दे.गो.तुकुम येथील आदिवासी कुळमेथे जमीन हडप केली आहे, शिवसेना अध्यक्ष चंद्रपूर बंडु हजारे भाऊ यांनी पत्रकार परिषद घेऊन नुकतेच बादल उराडे व इतरावर कारवाई करन्याची मागणी केली होती. याच बादल उराडे यांनी बलारपुर येथील आदिवासी महेशकर यांचीही जमीन हडप करून बोगस प्लाट पाडून नोटरी करून विकले, पत्रकार परिषद घेऊन पीडित आदिवासी यांनी माहिती दिली. याच बादल खुशालराव उराडे यांच्या विरुद्ध बलारपुर पोलिस ठाण्यात, चंद्रपूर पोलिस ठाण्यात, अनेक रिपोर्ट देऊन कारवाई झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बलारपुरचे शहर अध्यक्ष असलेल्याने, पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून पक्षकारांना, धमकावने,खोट्या तक्रारी करने, स्वतःच गुंडगिरी प्रवूतीचा व्यक्ती आहे. बलारपुर पोलिस प्रशासन यांनी बयाना करीता बोलाविले असता,जो प्रकार घडलाच नाही, तरीही खोट्या तक्रारी लोकसेवकांना देने,हा IPC कलम १८२ नुसार गुन्हा आहे.
पोलिस प्रशासन यांनी तात्काळ न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी बादल खुशालराव उराडे यांच्या सह त्याला सहकार्य करना-या वकिलावर देखील FIR रजीष्टर करावे अशी गंभीर रिपोर्ट विनोदकुमार खोब्रागडे यांनी,मा.पोलीस अधिक्षक चंद्रपूर, उपविभागीय पोलिस अधिकारी राजुरा व बलारपुर पोलिस ठाण्यात दिली आहे. हे सर्व हकिकत आज मा. मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब प्रथम श्रेणी चंद्रपूर यांना पुराव्यानिशी सांगितले आहे.
फिर्यादी विनोदकुमार खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते यांनी पुराव्यानिशी फौजदारी खटला न्यायालयात दाखल करून आज आर्गुमेंन्ट केले आहे. न्यायमूर्ती काय आदेश करतात याकडे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. जनहितार्थ जारी समाजहितासाठी देशहितासाठी राष्ट्रबांधनीसाठी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे धन्यवाद
९८५०३८२४२६
८३२९४२३२६१

COMMENTS

You cannot copy content of this page