गौतम नगरी चौफेर हकानी शेख प्रतिनिधी जिवती:- तालुक्यातील पिट्टीगुडा पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्याला ऊत आला असल्याचे चर्चेला उधाण आले आहे. ठाण्याच्या संबंधित काही गावात अवैध दारू विक्री जोमात सुरू असून याकडे संबंधित ठाणेदाराचे दुर्लक्ष म्हणावे की आर्थिक हितसंबंध जोपासत असणार का अशी चर्चा परिसरातील जनतेत ऐकायला मिळत आहे. कारण मरकागोंदी ते शेणगाव या मार्गावर खुलेआम अवैध दारू विक्री करणारे विक्रेता कोण? मरकागोंदी चौकात दारू डोसणाऱ्याची गर्दीच गर्दी दिसत असल्याची आणि अवैध दारू विक्रीची चर्चेला उदान आले आहे. चर्चा अशी पण आहे की ही सर्व माहिती संबंधित ठाण्याला असून तरीपण या अवैध दारू विक्री कडे विशेष करून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सुजण नागरिकाकडून बोलले जात आहे. या अवैध दारू विक्रीला आळा घालण्यात येणार की. अवैध दारू विक्रीला रान मोकळे सोडण्यात येणार? परिसरातील जनतेला मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीमुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे. संबंधित पोलीस ठाणेदारांनी तात्काळ अवैध दारू विक्री व तसेच अवैध धंद्याला लगाम घालावा अशी मागणी जोर धरत आहे.
COMMENTS