गौतम नगरी चौफेर :- प्रियंका गायकवाड मनात जिद्द, चिकाटी आणि परिश्रम घेण्याची क्षमता असली की जीवनात आपण काही करू शकतो हे एका ग्रामीण भागातील पोर्णिमा किर्तीवार नावाच्या तरुणीने करुन दाखविले. आज मूल चंद्रपूर या मुख्य मार्गावर हाॅटस्पाट नावाचे सर्वसोयीने युक्त असलेले पाॅश रेस्टॉरंट ताठ मानाने उभे आहेत. याच रेस्टॉरंटच्या संचालिका आहे पौर्णिमा किर्तीवार !
तिच्या नावातच किर्ती असल्यामुळे अल्पकालावधीत हे रेस्टॉरंट प्रसिद्धीच्या झोतात आले. ग्राहकांचाही प्रतिसाद उत्तम मिळत आहे. सहज सुचलंच्या शब्दाचा आधार आणि तिची हिंमत याच बळावर तिने रेस्टॉरंट या व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल केली. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे रेस्टॉरंट व्यवसायाच्या माध्यमातून प्रवास करणे ही काही साधी व सोपी गोष्ट नाही. पण पोर्णिमाने कोणाचा आधार नसताना स्वयं बळावर बँकचे उंबरठे झिजविले व कर्ज मंजूर करुन घेतले. आज त्या कर्जाची नियमित परतफेड तिच्या कडून होत आहे. मुलाचा, सास-यांचा व एका खासगी सस्थेतील सर्व कार्यभार सांभाळून ती आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडीत आहे.
नवोदितांना पोर्णिमाचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.



COMMENTS