साकोली केंद्र क्रीडा महोत्सवाची झाली शानदार सुरुवात

HomeNewsनागपुर डिवीजन

साकोली केंद्र क्रीडा महोत्सवाची झाली शानदार सुरुवात

जिल्हा परिषद हायस्कूल क्रीडा मैदान खेळाडूंनी गजबजले • तीन दिवस चालणार विविध सामने

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – जिल्हा परिषद शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची शानदार सुरुवात ( मंगळ. ०६ जाने.) ला क्रीडा संकुल मैदानावर झाली. तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला असून खेळाडूंनी क्रीडा संकुल मैदान गजबजून गेले आहे. हे आयोजन साकोली केंद्र वतीने असून यात १ ते ७ वर्गातील मुलामुलींचे सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे. याचा जास्तीत जास्त जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
         

या शुभारंभीय महोत्सवात मुलांनी मानवंदना देत आकर्षक पथसंचलन केले. याप्रसंगी मंचावर उदघाटक नगराध्यक्षा देवश्री कापगते, अध्यक्ष पं.स. सभापती ललित हेमणे, दिपप्रज्वलन जि.प. सभापती शितल राऊत, जि.प.स मदन रामटेके, वनिता डोये, विशेष अतिथी पं.स. उपसभापती करूणा वालोदे, प्रा. होमराज कापगते, गटशिक्षणाधिकारी विजय आदमने, सरीता करंजेकर, छाया खर्डेकर, केंद्र प्रमुख ए. बी. मेश्राम, केंद्राध्यक्ष एस. आर. हटवार, न. प. चे नगरसेवक कुणाल राऊत, राजकुमार पोगडे, रेणू गणविर, मेघा बडवाईक, वैशाली लांजेवार, निर्मला नंदेश्वर, स्मिता सिडाम, त्रिवेणी चौधरी, प्रा. धर्मेंद्र कोचे, शाळा व्यव. अध्यक्ष योगराज मुंगमोडे आदी उपस्थित होते. भाषणात प्रा. होमराज कापगते हे म्हणाले की, माझ्या पंचायत समिती सदस्य १ लाख निधीतून सर्व निधी या मुलांच्या क्रीडा महोत्सवाला देण्याची मी आज घोषणा करीत आहे. नगराध्यक्षा देवश्री कापगते यांनी सांगितले की जिल्हा परिषद विद्यार्थ्यांनी प्रत्येक खेळांमध्ये भाग घेत उच्च शिखर गाठावे. यावेळी सर्व मान्यवरांनी या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवासाठी विद्यार्थ्यांना विजयश्रीच्या शुभेच्छा देत मुलांना विशेष मार्गदर्शन केले. प्रसंगी ०६ जानेवारी पत्रकार दिनी मंचावर पत्रकार जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांचे मान्यरांकडून विशेष स्वागत करण्यात आले व पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. येथे संचालन शिक्षक टी. आय. पटले, सुरेश हर्षे यांनी केले. तर आभार एस. आर. हटवार यांनी मानले. येथे उद्घाटनीय कबड्डी सामना हा लवारी विरूद्ध सेंदूरवाफा असा रंगला आणि याचा पूर्ण आस्वाद मान्यवरांनी दर्शक म्हणून घेतला हे विशेष.
       

  या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवासाठी कार्यकारी मंडळ समितीचे प्रमेश मरसकोल्हे, सुरेश धकाते, सविता ब्राह्मणकर यांसह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि घोषणा समिती, दप्तर समिती, मार्चपास्ट समिती, बक्षीस वितरण समिती, वैयक्तिक ( प्राथमिक व माध्यमिक ) खेळ पंच समिती, परीक्षक समिती ( सांस्कृतिक ), प्रेक्षणीय कवायत समितीचे सर्व साकोली केंद्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे ०६, ०७ व ०८ जानेवारी असे तीन दिवस विशेष परिश्रम घेत आहेत.

COMMENTS

You cannot copy content of this page