गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – आज दिनांक 8 डिसेंबर 2024 रोज रविवारला सकाळी 10 वाजता समाजाला माझ्या समाजाला किर्तन व अभंगाच्या माध्यमातून शिकवण देणारे संत जगनाडे महाराज यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त मंडई पेठ येथील संत जगनाडे महाराज समितीच्या वतीने संत जगनाडे महाराजांची पालखी काढण्यात येऊन भव्य मिरवणूक अड्याळ शहरात पारंपारिक पद्धतीने काढण्यात आली. या रॅलीमध्ये पारंपारिक पद्धतीने शेतकरी शेतीत चालवत असलेले नांगर, पारंपारिक पद्धतीने तेल घाणीचे दृश्य, ढोल ताशांच्या गजरात, उंटाचे प्रदर्शन, या रॅलीमध्ये मुख्य देखावा होता. या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने तेली समाजाने सहभाग घेतला होता. रॅली यशस्वी करण्याकरता प्रकाश मानापुरे, सुरेश गायधने, रवींद्र कुरंजेकर, भगवान कुरंजेकर, राजू वंजारी, अमोल उराडे, गोपाल लांबट, शंकर मानापुरे, जयश्री कुंभलकर, ज्योती कुंभलकर, महेश कुंभलकर, राहुल खोब्रागडे, अविनाश गभणे, विवेक मोटघरे व असंख्य महिला, पुरुष रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
COMMENTS