गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा : शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा शिक्षण विभागाचा आढावा संबंधी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्याचे औचित्य साधून समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी महाराष्ट्र राज्य यांनी भेट घेतली. यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील समग्र शिक्षा अभियानातील एकूण 3105 कंत्राटी लोकांना कायम करण्यात आले त्या पद्धतीने उर्वरित 3050 लोकांना कायम करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्याबाबत शिक्षण मंत्र्यांनी लवकरच आपण समितीची सभा घेऊ आणि इतर राज्यात ज्या पद्धतीने समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले, त्या धरतीवर आपल्या महाराष्ट्रात देखील आपल्या या 3050 बांधवांना निश्चितच न्याय मिळवून देऊ अशी त्यांनी ग्वाही दिली. याप्रसंगी महिला भगिनींनी दादा भुसे यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधली आणि त्यांनी राखीची भेट निश्चितच देण्याचे कबूल सुद्धा केले.
एकंदरीत आजच्या या शिक्षणमंत्र्याशी घडून आलेल्या भेटीचा निश्चितच सकारात्मक परिणाम घडून येईल अशी आशा सर्व समग्र शिक्षा अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिसून येत आहे. यामध्ये जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता, कार्यक्रम अधिकारी, संगणक प्रोग्रॅमर विषय साधन व्यक्ती, MIS Coordinator, डाटा एन्ट्री ऑपरेटर, रोखपाल असे 3050 लोक संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी सतत 25 वर्षापासून कार्य करीत आहेत. आज अनेकांचं सेवानिवृत्तीचे वय सुद्धा झालेले आहे. तरी उर्वरित कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याबाबत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आश्वस्त केले. यावेळी उपस्थित कर्मचारी सुनील मोटघरे, राम वाढीभस्मे, उज्वला बावनकार, संगिता भवसागर, रामरतन भाजीपाले, विरेंद्र गौतम, अर्चना बेदरकार, अर्चना गभने, मेघेश्वरी बिसेन, मंगला खोब्रागडे अनिल येले, कालिदास गहाणे, दीपाली बोरीकर, वैशाली नगराळे, श्रावन धांडे, प्रियंका लांजेवार, विवेक बोरकर, शुभ्रा कांबळे व जिल्ह्यातील समग्र शिक्षाचे कर्मचारी उपस्थित होते


COMMENTS