राजुरा येथील रमाबाई नगर येथे महिलेचा खून – अज्ञाता विरूध्द गुन्हा दाखल

HomeNewsनागपुर डिवीजन

राजुरा येथील रमाबाई नगर येथे महिलेचा खून – अज्ञाता विरूध्द गुन्हा दाखल

गौतम नगरी चौफेर //राजुरा – राजुरा शहरातील रमाबाई नगर येथील रहिवाशी महिला कविता रायपूरे, वय 55 या एकट्या घरी असतांना त्यांचा खून झाल्याची घटना आज दिनांक 15 जून रोजी सकाळी साडे सात वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
              रमाबाई नगर येथील हनुमान मंदीराजवळील रहिवाशी श्रीमती कविता रायपूरे यांचा मुलगा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. तो रात्री 8 वाजता आपल्या कामावर गेला होता. त्यामुळे ही महीला घरात एकटीच होती. दिनांक 15 जुन ला सकाळी शेजारी राहणारी महिलेची विवाहित मुलगी ममता अलोणे हीने दार ठोठावले, तेव्हा त्यांचे घरातून कुणाचाही आवाज आला नाही. खिडकीतून बघितल्यावर या महिला काॅटवर झोपून असल्याचे दिसले. मात्र काहीही प्रतिसाद देत नसल्याने काही वेळानंतर दार उघडताच महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या महिलेच्या डोके, छाती व चेह-यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून आले. या परिवाराचे कुणाचे वैमनस्य होते की अन्य काही देवाणघेवाणीच्या कारणांमुळे ही हत्या झाली, याचा तपास राजुरा पोलिस करीत आहेत. घटनेचा तपास ठाणेदार सुमीत परतेकी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक निशा भूते अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS

You cannot copy content of this page