– तहसील कार्यालयात आयोजन
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरू होणाऱ्या आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत राबविण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ तसेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राजुरा तालुक्यातील जनतेला एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ व माहिती देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या सेवा महाशिबीराचे उदघाटन आमदार देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते तहसील कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी विविध शासकीय योजनांकरता पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व लाभांचे वितरण करीत नागरीकांना केंद्र व राज्य सरकारच्या अशा लोककल्याणकारी योजनांचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन केले. याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाच्या राज्यस्तरीय शुभारंभपर दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन पार पडले. या महाशिबीरात महसुल, पंचायत, कृषि, वने, भुमिअभिलेख, नगरपरिषद, आरोग्य, पशुसंवर्धन, महिला बालकल्याण व इतरही शासकीय विभागांकडून आपापल्या विभागाच्या योजनांचे स्टॉल लावून नागरिकांना विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या योजनांची माहीती व विविध योजनांमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे तसेच लाभांश, साहित्याचे वितरण करण्यात आले. यासोबतच मोफत आरोग्य तपासणी, शेतकरी बांधवाना मार्गदर्शन, घरकुल पट्टे वाटप, सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्टे वाटप करणे, चुकून वर्ग २ झालेल्या शेतजमिनी भोगवटा-१ करणे आदी लाभांचा याठिकाणी अंतर्भाव होता.
या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, तहसीलदार ओमप्रकाश गोंड, संवर्ग विकास अधिकारी भागवत रेजीवाड, उपविभागीय वनाधिकारी मंगेश गिरडकर, उपविभागीय कृषी अधिकारी जाधव, तालुका कृषी अधिकारी विनायक पायघन, पोलिस निरीक्षक सुमित परतेकी, सहाय्यक गट विकास अधिकारी बोबडे, भूमी अभिलेख अधीक्षक सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे, जि. प. बांधकाम उपअभियंता प्रबोधिनी मेंढे, भाजपचे शहराध्यक्ष सुरेश रागीट, जिल्हा उपाध्यक्ष सुनील उरकुडे, तालुका महामंत्री दिलीप गिरसावळे, हरिदास झाडे, सरपंच बाळनाथ वडस्कर, कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई, विनोद नरेंदूलवार, सागर भटपल्लीवार आदिंसह शासकीय अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.


COMMENTS