गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे त्रिरत्न बौद्ध महासंघ केंद्र भंडारा धम्म वर्ग पवनी अंतर्गत ध्यानसाधना व व्यक्तिमत्व विकास हिवाळी धम्म शिबिराचे 1 नोव्हेंबर 2024 सायंकाळी 6.30 वाजेपासून तर दिनांक 7 नोव्हेंबर 2024 सकाळी 9 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आलेले आहे. शिबिराचा खर्च भागविण्यासाठी संयोग राशि प्रत्येकी 800 रुपये ठेवण्यात आलेली आहे. प्रशिक्षणात येणाऱ्या व्यक्तीला लेखन साहित्य सोबत आणावे, संपूर्ण सहयोग राशी भरून संपूर्ण कालावधी करिता प्रवेश निश्चित करावा, उपचाराकरिता औषध सोबत आणावे आणि व्यवस्थापकाकडे विशेष नोंद करावी, शिबिरात मोबाईलचा वापर करता येणार नाही . भगवान बुद्धाचा धम्म सुखाने जीवन जगण्याची कला आहे. आपल्याजवळ कितीही पैसा ,धन, संपत्ती, पदप्रतिष्ठा सत्ता असली तरी बुद्धाच्या मते आपण खऱ्या अर्थाने माणूस म्हणून सुखी जीवन जगू शकत नाही. आणि म्हणून दरवर्षी धम्मवर्ग पवनीच्या वतीने धम्म शिबिराचे आयोजन केले जाते. शिबिराचा विषय मेघीय सुत्त असून या शिबिराला धम्मचारीणी अमोघ श्री चंद्रपूर, धम्मचारीणी ज्ञासखी नागपूर, धम्मचारीणी अमृतावजी पुलगाव, धम्मचारी अमयरत्न नागपूर, धम्मचारी विमरत्न नागपूर, मार्गदर्शन करणार आहेत. करिता या शिबिराचा लाभ घेण्याचे आयोजन आयोगातर्फे करण्यात आलेले आहे.
COMMENTS