साकोली येथे केला शिक्षकांचा सत्कार ; स्नेह मिलन सोहळा संपन्न
गौतम नगरी चौफेर /संजीव भांबोरे भंडारा – सन १९९६ ला सेकंडरी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल येथे दहावीला शिकत असलेल्या मित्र मैत्रिणींचे तब्बल २९ वर्षांनंतर साकोलीत अनोखी एकत्र भेट झाली. हा “स्नेह मिलन सोहळा” ( रवि. २५ मे ) ला शाळा परीसरात आयोजित करण्यात आला. येथे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी दिर्घ काळाने एकत्र भेटून अत्यंत भावूक झाले होते हे विशेष.
सन १९९६ ला साकोलीत दहावी करून गेलेले सर्व मित्र मैत्रिणी विखुरले गेले. त्याकाळी डिजिटल युग नव्हते. पण आज २९ वर्षांनंतर आजच्या डिजिटल युगाने सोशल मिडीयातून फेसबुक व व्हॉट्सॲपद्वारे सर्वांना एकत्र आणले. एस ई एस १९९६ मित्र या समुहाने हा अविस्मरणीय सोहळा आयोजित केला. प्रसंगी शिक्षिका श्रीमती रानडे व शिक्षक रानडे सर यांना सर्व मित्रांकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. २९ वर्षांनंतर आपले विद्यार्थी पाहून शिक्षिकाही गहिवरून आल्या होत्या. यावेळी शिक्षिका रानडे यांनी सांगितले की, “मला गुरूदक्षिणा हवी, की तुम्ही सर्व असेच या धकाधकीच्या जीवनात पुन्हा पुन्हा भेटत रहा, आपले मित्रत्वाचे स्नेहानुबंध शेवटपर्यंत कायम ठेवा व हिच माझी गुरुदक्षिणा राहील असे मला वचन द्या” असे उदगार काढताच सर्व विद्यार्थी भावूक झाले होते. यावेळी सर्व मित्र मैत्रिणींनी शाळेचे भ्रमण करीत जेथे ५ वी पासून शिकलो ते सर्व वर्गात बघून आठवणींना उजाळा दिला. आयोजित स्नेह मिलन सोहळ्यात विद्यार्थ्यांनी गीत गायन, जुन्या आठवणी कथन, हास्यविनोद व स्नेहभोजन असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते.

या अविस्मरणीय, व अत्यंत भावूकमय सोहळ्याला मित्र मैत्रिणी रश्मी तनवानी, ललिता डोंगरवार, राखी खुणे, पुष्पा मोहतुरे, अर्चना फुंडे, हर्षा पाठक, सीमा मेश्राम, भावना रामटेके, गायत्री येवले, गिता मेश्राम, हेमलता डोये, से.नि. लष्कर सैनिक हरजीत बांते, ॲड. मनिष कापगते, डॉ. अमित शहारे, अनिल चुघ, दुर्गेश चौहान, चंद्रकांत कुथे, अविनाश रंगारी, पोलीस नायक हरीश बुंदेले, प्रितम सुर्यवंशी, आनंद गायकवाड, प्रा. सतिश धुर्वे, गजेश पाठक, ॲड. गोवर्धन झोडे, प्रा. प्रकाश लांजेवार, आशिष चेडगे, अमोल हाडगे, सुशांत गुप्ता, मनिष शहारे, रापमंचे प्रविण भांडारकर, धर्मेंद्र वाडीभस्मे, चेतन चौहान, दिपक जांभूळकर, महेंद्र बडोले, प्रविण राऊत, राहुल राऊत, उमेश बन्सोड हे सर्व उपस्थित होते. शेवटी निरोप समारंभात विद्यार्थी जातांना मात्र विद्यार्थी हे अश्रृमय भावूक झाले होते.

COMMENTS