“बिना संडासाचे गाव” ते “सुलभ शौचालययुक्त” झाले सीओ मंगेश वासेकर यांच्या पुढाकाराने • २०१७ पासून कुणीही हे कार्य केले नव्हते
गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा) – साकोली सन २०१८ ला एका जागृत पत्रकाराने “साकोलीत संडास शोधा व नगदी १० हजार मिळवा” असा फतवा काही नगरपरिषदेतील बेजबाबदार व भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधींवर काढला होता. तरीसुद्धा त्यांना जाग आली नाही. पण वारंवार ही एका स्थानिक “साकोली मिडीया” ची रास्त मागणी पाहता येथील जबाबदार व कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी आता “सुलभ शौचालय युक्त साकोली शहर” हा मान देण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे व हे तेवढेच खरे आहे.
येथे सन २०१७ ला नगरपरिषद स्थापनेपासून तर २०२२ पर्यंत हे “बिना संडासाचे गाव” कुणाच्याही लक्षात आले नाही का.? की रविवारी बाजारातील महिला पुरुष चक्क तलावावर शौचास जात होते. महामार्गावर एक साधे मुत्रीघर बांधू शकले नाही. मग एवढा ४ वर्षांचा आलेला विकासनिधींची कोणत्या मार्गाने विल्हेवाट लावली.? हा प्रश्न आजही जागरूक व शिक्षित जनता विचारीत आहेत. कित्येकदा शहरातील चौकाचौकात बाहेरील पाहुणे थांबले होते, त्यांनी “फ्रेश” व्हायला येथे सुलभ शौचालय कुठे आहे हे विचारले होते. पण नाईलाजाने त्यावेळी एका ब्रिटीशकालीन तहसील साकोलीची बदनामी झाली होती. ती बदनामी कुणामुळे झाली. तर त्यांची चौकशी आता समोरच्या नगरपरिषद निवडणुकीत जनतेत प्रलंबित व सडेतोड उत्तरात आहे. अनेकदा “साकोली मिडीया” ने बिना संडासाचे गाव हे नगरपरिषदेच्या लक्षात आणून दिले. पण दोन वर्षांपूर्वी रूजू झालेल्या सीओ मंगेश वासेकर यांनी या गंभीर मागणीची तातडीने दखल घेत आता शहरात एक नागझिरा रोड चौकात तर दूसरे एकोडी रोड आठवडी बाजाराच्या मुख्य जागेवर सुलभ शौचालयांचे काम पूर्ण झालेले आहे हे त्यांचे उल्लेखनीय कार्य म्हणावे लागेल.
फक्त लोकांना दारू पाजून, मटण चारून व पैशाची पॉकीटे वाटून फक्त “नगरसेवकगिरी” हा धंदा व्यवसायासाठी पैशाच्या जोरावर निवडून येणा-यांनाही हा “बिना संडासाचे खेडेगाव” हा प्रकार दिसला नव्हता. पण येथील शांततामय जनता आता जागोजागी चर्चा करून दाखवित आहेत की, लबाडांच्या प्लॅनींगला आता आम्ही जनता पूर्ण समजून गेलो आहे, ऐवढा ४ वर्षात निधी उपलब्ध होऊनही एक साधे शौचालय काय तर मुत्रीघर बांधू शकले नाही.? तर यांची निवडणूकीपूर्वी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून अखेर यात कोणता मोठा भ्रष्टाचार झाला आहे ते जनतेसमोर उघडकीस येणे अत्यंत आवश्यक आहे कारण हा पैसा त्यांच्या हरामाचा नाही तर शासकीय व जनविकासाचा पैसा आहे अशी प्रतिक्रिया सध्या जनतेत सुरू असून कधी न होणारे दोन सुलभ शौचालयांची एका वर्षातच शहराला सौभाग्य मिळवून देणारे सीओ मंगेश वासेकर यांचे जनतेने अभिनंदन करणे सुरू आहे.


COMMENTS