अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडच्या 9 दिवसीय सिलाई प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

HomeNewsनागपुर डिवीजन

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडच्या 9 दिवसीय सिलाई प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

गौतम नगरी चौफेर //आवारपूर – अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपूर अंतर्गत असलेल्या अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाउंडेशन व उषा इंटरनॅशनल लिमिटेड, यांच्या संयुक्त विद्यमाने 22 एप्रिल ते 1 मे 2025 दरम्यान 9 दिवसीय सिलाई प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आवारपूर, बिबी, नांदा, नोकरी, पालगाव, बाखर्डी, राजुरगुडा, हिरापूर येथील एकूण 25 महिलांना मोफत सिलाई प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश महिलांचे सशक्तीकरण करणे, त्यांना नवीन कौशल्ये शिकवणे व अधिक उत्पन्न मिळविण्यास मदत करणे होता. प्रशिक्षणात सिलाई मशीनची दुरुस्ती व देखभाल, मार्केटिंग आणि जीवन कौशल्ये शिकवण्यात आली. 9 दिवसांच्या कार्यक्रमात 25 विविध प्रकारचे कपडे शिवण्यात आले.

प्रत्येक महिला आपल्या गावात अल्ट्राटेक—उषा सिलाई स्कूल सुरू करणार असून, त्या 20 नवीन महिलांना प्रशिक्षण देणार आहेत. ट्रेनिंग च्या शेवटल्या दिवशी सिलाई मशीन वितरण कार्यक्रमासाठी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपूरचे युनिट हेड पी.एस. श्रीराम, सुधा श्रीराम, अध्यक्ष सयोनी लेडीज क्लब, नमित मिश्रा, उपाध्यक्ष मानव संसाधन विभाग, सौदीप घोष, उपाध्यक्ष माईन्स विभाग, सतीश मिश्रा, एडमिन सेक्शन हेड, किरण करमरकर, प्रतिक वानखेडे, सीएसआर विभाग प्रमुख यांच्या उपस्थिती होती.

COMMENTS

You cannot copy content of this page