आमदार , खासदार , प्रशासनाचे अधिकारी यांचे या खड्ड्या बाजारांकडे दुर्लक्ष
गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – पहेला ते अड्याळ कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर इटगाव पुनर्वसन (पागोरा) या ठिकाणी खड्ड्यांचा बाजार भरला असून त्या ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्याच्या बाजारातून आमदार, खासदार, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी रोज आपल्या वाहनाने ये जा करीत असतात परंतु हे 100 मीटर असलेल्या खड्ड्यांकडे कोणत्याही जनप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. त्यामुळे हे जागोजागी असलेले खड्डे अपघातास निमंत्रक ठरत आहेत. कोणाच्या जीव केव्हा जाईल हे सांगता येत नाही. म्हणून जिल्हा प्रशासनाने व जनप्रतिनिधी याकडे तात्काळ लक्ष देऊन ते जागोजागी बाजार भरलेले खड्डे तात्काळ बुजवून रस्त्याचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्यात यावे अशी सर्वसामान्य जनतेची ओरड आहे. मागील चार महिन्यापासून या रस्त्यावर गाडी गिट्टी पाडून ठेवलेली आहे परंतु ठेकेदाराने अजून पर्यंत ते काम पूर्ण केलेले नाही. आता जनतेला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
COMMENTS