सन्मान द्या आणि सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत

HomeNewsनागपुर डिवीजन

सन्मान द्या आणि सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत

गौतम नगरी चौफेर // भंडारा पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त , राज्यस्तरीय ऑफलाइन स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थी सत्कार, रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी, व विविध सामाजिक क्षेत्रातील 70 कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा 9 जूनला शांतीवन बुद्ध विहार  चिचाळ येथे होणार कार्यक्रमाचे आयोजन माजी खासदार डॉ खुशाल बोपचे, मुख्य संपादक दशरथ सुरडकर, जटा टीव्हीचे निखिलेश कांबळे उपस्थित राहणार भंडारा- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व विदर्भ विभागीय दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे संपादक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त 9 जून 2025 ला दुपारी 3 वाजता राज्यस्तरीय  घेण्यात आलेल्या ऑफलाइन  सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम, द्वितीय , तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध सामाजिक क्षेत्रातील 70 कार्यकर्ते त्यात प्रामुख्याने 50 कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह, सन्मान प्रमाणपत्र ,पुष्पगुच्छ व मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 21 सामाजिक कार्यकर्त्यांना भारतीय संविधान , सन्मान प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर छत्रपती संभाजीनगर हे करणार आहेत ..तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ .खुशाल बोपचे हे राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून शिवशंकर मुंगाटे सरपंच अड्याळ तथा माजी उपसभापती पंचायत समिती पवनी, सहाय्यक पोलीस  निरीक्षक धनंजय पाटील अड्याळ, संविधान संघर्ष समिती भंडारा जिल्हा चे अध्यक्ष रोशन जांभुळकर, जनता टाईम/ जनता टीव्हीचे मुख्य संपादक निखिलेश कांबळे नागपूर,शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथील संचालक जीवन बोधी बौद्ध नागपूर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.सदर कार्यक्रमात विविध सामाजिक क्षेत्रातील 70 कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे .त्यात प्रामुख्याने सदानंद धारगावे, अमरकंठ समरीत, अभय रंगारी, रूपचंद रामटेके ,रोशन जांभुळकर ,पंकज वानखेडे ,दुर्गेश राऊत ,प्राध्यापक राजेश नंदपुरे ,डॉक्टर अक्षय कहालकर ,गणेश पारधी, जीवन बोधी बौद्ध ,डी जी रंगारी, डॉक्टर गणेश मेश्राम, अशोक वाहने, शिवशंकर मुंगाटे ,आशिष चेडगे, जयदेव देशमुख ,भावेश कोटांगले, नरेंद्र भाऊ कातोरे ,डॉअर्पण कुमार संघरत्ने,नम्रता बागडे, प्राध्यापक राहुल डोंगरे ,भीमराव टेंभुर्णे ,मनोज चिंचघरे, विजय नंदागवळी ,सतीश सोमकुवर ,दिलीप वानखेडे ,तुळसीराम गेडाम, पोर्णिमा साखरे ग्रामपंचायत अधिकारी अड्याळ,सुनील सूर्यवंशी ,संजय वंजारी ,कुलदीप गंधे ,विलास बांडेबुचे, गुलाब घोडसे, अर्पित मेश्राम, भैयालाल मेश्राम ,अनिल चचाने ,विनय ढोके,प्रशांत बोदेले ,तनुजा नागदेवे, विपिन टेंभुर्णे, विकास टेंभुर्णे ,अमोल थुलकर ,यांच्या समावेश आहे. व राज्यस्तरीय ऑफलाइन स्पर्धेत प्रथम क्रमांक अंकित वसंता लोंदासे , विलास दुर्गेश लोंदासे , सुमेध खुशाल खोपे यांचा सुद्धा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 21 कार्यकर्त्यांना भारतीय संविधान पुस्तक, सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने नासिकचवरे , श्रीकांत नागदेवे, सोहेल खान ,राजेश मेश्राम , गेडाम,ग्रामपंचायत अधिकारी, राजकुमार राऊत ,पत्रकार विशाल रणदिवे,धनंजय मुलकरवार, प्राध्यापक सुरज सुरज गोंडाने,तलाठी रवींद्र हटवार ,प्राध्यापक शेखर बोरकर, ग्रामसेवक शालिक लुटे, विक्रांत भालाधरे, पत्रकारशशिकांत भोयर, मुनेश्वर बोदलकर, पत्रकार प्रवीण तायडे, पत्रकार संजय दांडगे, पत्रकार जयश्री सोनवणे, पत्रकार गोकुळ सिंग राजपूत, यांचा समावेश आहे .सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत समर्पण ब्लड बँक भंडारा यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन व नेत्रसेवा हॉस्पिटल भंडारा यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे अर्पित मेश्राम व मित्र परिवारातर्फे करण्यात आलेले आहे. करिता कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजका तर्फे करण्यात आलेले आहे.



.

COMMENTS